आशाताई बच्छाव
जयश्री सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विलासराव वाघ तर व्हा चेअरमनपदी जयश्री बाजारे
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे
निफाड तालुक्यातील भाऊसाहेब नगर येथील जयश्री प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थेच्या चेअरमनपदी
रानवड विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी चेअरमन विलासराव गंगाधर वाघ यांची तर व्हा चेअरमनपदी जयश्री प्रकाशराव बाजारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सर्वच संचालकांना कामाची संधी मिळावी म्हणून आवर्तन पद्धतीने मावळचे चेअरमन हेमंत माणिकराव बोरस्ते व व्हा चेअरमन गणपत सुखदेव हाडपे यांनी राजीनामा दिल्याने श्री विलासराव वाघ व सौ जयश्री बाजारे यांची निवड करण्यात आली. सहकार खात्याचे अधिकारी कैलास सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ही निवड करण्यात आली. निवडणूक कामी पतसंस्थेचे व्यवस्थापक चिंधू सुरवाडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कैलास सोनवणे यांना निवडणूक कामी सहाय्य केले.
अध्यक्षपदासाठी विलासराव वाघ यांच्या अर्जावर सूचक म्हणून हेमंत बोरस्ते व अनुमोदक म्हणून गणपत हाडपे यांनी तर उपाध्यक्षपदासाठी सौ जयश्री बाजारे यांच्या अर्जावर सुचक इकबाल शेख व अनुमोदक म्हणून जगन्नाथ गवळी यांनी स्वाक्षरी केली होती. निर्धारित वेळेत चेअरमन पदासाठी विलासराव वाघ व व्हा चेअरमन पदासाठी सौ जयश्री बाजारे यांचे एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कैलास सोनवणे यांनी जाहीर केले.
यावेळी संस्थेचे जेष्ठ सभासद आणि मार्गदर्शक माणिकराव बोरस्ते, भास्करराव बनकर, दिलीपराव मोरे ,राजेंद्र डोखळे ,सोमनाथ मोरे, प्रकाशराव बाजारे यांच्या हस्ते नवनिर्वाचित चेअरमन विलासराव वाघ ,व्हा चेअरमन जयश्री बाजारे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी संचालक हेमंत बोरस्ते, गणपतराव हाडपे ,छोटू काका पानगव्हाणे, सचिन मोगल, जगन्नाथ गवळी, किरण शिंदे, डॉ प्रकाश रसाळ, अर्चना मतसागर ,पतसंस्थेचे व्यवस्थापक चिंधू सुरवाडे यांच्यासह सभासद ,हितचिंतक, ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संचालक मंडळ ,सभासद कर्मचारी, अधिकारी यांच्या सहकार्यातून व समन्वयातून संस्थेचा नावलौकिक व प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी आम्ही सामूहिक प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित चेअरमन विलासराव वाघ व व्हा चेअरमन सौ जयश्री बाजारे यांनी सांगितले.