Home नाशिक वाकद जि प शाळेचे बाबासाहेब आवारे गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

वाकद जि प शाळेचे बाबासाहेब आवारे गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

108
0

आशाताई बच्छाव

1001937519.jpg

वाकद जि प शाळेचे बाबासाहेब आवारे गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

माणुसकी फाउंडेशन ने घेतली शैक्षणिक कार्याची दखल

रामभाऊ आवारे
निफाड नाशिक प्रतिनिधी

माणुसकी फाउंडेशन निफाड यांच्या वतीने आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून तसेच मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रल्हाद निकाळे सर यांच्या चतुर्थ स्मरणार्थ माणुसकी फाउंडेशन निफाड यांच्या वतीने आयोजित ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या नियोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये वाकद तालुका निफाड येथील जि प शाळेचे आदर्श शिक्षक बाबासाहेब विठोबा आवारे सर यांना कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ,ज्येष्ठ साहित्यिक, लेखक, राष्ट्रपती पदक विजेते बी जी शेखर साहेब विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक पोलीस परिक्षेत्र यांच्या शुभहस्ते शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे अशी माहिती माणुसकी फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष पत्रकार सागर निकाळे यांनी दिली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा दूध उत्पादक संघाचे मा चेअरमन शिवाजी दादा ढेपले होते, व्यासपीठावर लासलगाव बाजार समितीचे सभापती डी के नाना जगताप, ह भ प ज्ञानेश्वर माऊली शिंदे राम कृष्ण हरी साधना आश्रम रुई, शिक्षक नेते संजय चव्हाण सर, ज्येष्ठ नेते भागवत आण्णा बोचरे देवगाव, रासाका चे मा चेअरमन शंकरराव कोल्हे, माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार सागर निकाळे, शौर्य रणरागिनी संपादिका गायत्री लचके, संपतराव रोटे ,नामदेवराव गायकवाड ,सामाजिक कार्यकर्ते दत्ता काका रायते, ॲड शेखर देसाई, पोलीस पाटील राहुल सोनवणे, वारकरी मंच प्रदेश प्रसिद्धी प्रमुख पत्रकार रामभाऊ आवारे सर, माणिक कुशारे सर आदी उपस्थित होते.

Previous articleजिजाऊ महिला सहकारी पत Branch चेअध्यक्ष पदी सौ मनिषा राजेश नंदपुरे यांची एकमताने निवड
Next articleनाशिकला २१ रोजी लेखक भूषण सरदार आयोजित आवाज लेखणीचा काव्य संमेलन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here