आशाताई बच्छाव
शालेय वुशु क्रिडा स्पर्धेत वैभव गायकवाडची विभागीय स्पर्धेसाठी निवड
जालना -वसंतराव देशमुख
दिनांक १०/०९/२०२५
जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भाटेपुर येथील बारावीच्या विद्यार्थी वैभव संतोष गायकवाड या विद्यार्थ्याने वुशु या शालेय क्रीडा प्रकारच्या स्पर्धेत 48 किलो वजन गटात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविला असून त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
वैभव गायकवाड ने केलेल्या कामगिरीबद्दल संस्थेचे सचिव प्रा. डॉ. नंदकुमार माळशिखरे, अध्यक्ष श्री देविदास खारतुडे ,उपाध्यक्ष उषाताई माळशिखरे, संचालक नितीन भैय्या माळशिखरे, शिवाजी माळशिखरे यांनी अभिनंदन केले आहे.
शाळेचे मुख्याध्यापक रामदास आटोळे,आर.बी.जाधव,क्रीडा शिक्षक आर.पी. काळे, एस.एस. पवार, बी. एच. काळे, आर, ए. पाटील, प्रा.अनिल गावडे, प्रा. अनिता आटोळे, जी. के. तायडे, एन.एस. खटके, डी.व्ही.गाढे, यांनी वैभव गायकवाडचा यथोचित सत्कार केला. तसेच भाटेपुरी व खाणेपुरी परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.