आशाताई बच्छाव
दुचाकी व चारचाकी वाहने चोरणारा आरोपी गजाआड.
अहिल्यानगर, प्रतिनिधी कारभारी गव्हाणे –शहर व तालुक्यातून दुचाकी, पिकअप, मालवाहू वाहने चोरणाऱ्या आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी आज (ता. ९) जेरबंद केले. प्रणव निती पठारे (वय १९, देवळाली प्रवरा, ता. राहुरी) असे जेरबंद आरोपीचे नाव आहे.
अहिल्यानगरच्या एमआयडीसी परिसरातील एल.टी. कॉलनीतून रविवारी (ता. ७) एक पिकअप चोरीला गेल्याची फिर्याद एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगल शिंदे यांनी दाखल केली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना माहिती मिळाली होती की, देवळाली प्रवरा येथील प्रणव पठारे याने ही पिकअप चोरली आहे. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने देवळाली प्रवरा येथे जाऊन आरोपीला जेरबंद केले. तसेच त्याच्याजवळील चोरीची सात लाख ६० हजार रुपयांची वाहने केली