आशाताई बच्छाव
विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय कोळसा येथे स्वयंशासन दिन साजरा
हिगोली . श्रीहारी अंभोरे पाटील
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय, कोळसा येथे इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांनी स्वयंशासन दिन साजरा केला.इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये उत्तम शिक्षकांची भुमिका पार पाडली.यावेळी मुख्याध्यापक ऋतुजा माधव रोडगे व उपमुख्याध्यापक कांचन डोईफोडे यांनी भुमिका पार पाडली.यावेळी इयत्ता 10 वी चे वर्गशिक्षक चोपडे जी.एस.यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्तम अध्यापनाची भूमिका पार पाडली. यावेळी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री भास्करराव रामराव बेंगाळ साहेब,सचिव श्री अंकुशराव रामराव बेंगाळ साहेब, उपाध्यक्षा आनंदीताई भास्करराव बेंगाळ, प्राचार्य अभिषेक भैय्या बेंगाळ, मुख्याध्यापक श्री शिंदे आर.बी. श्री सरकटे सर, पर्यवेक्षक श्री कसाब सर तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.