Home नाशिक वनसगाव विद्यालयाचे कुंदन कुमार जाधव सर यांना मानाचा व सन्मानाचा गुणवंत शिक्षक...

वनसगाव विद्यालयाचे कुंदन कुमार जाधव सर यांना मानाचा व सन्मानाचा गुणवंत शिक्षक पुरस्कार

55
0

आशाताई बच्छाव

1001933786.jpg

वनसगाव विद्यालयाचे कुंदन कुमार जाधव सर यांना मानाचा व सन्मानाचा गुणवंत शिक्षक पुरस्कार

मा विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ बी जी शेखर साहेब यांच्या शुभहस्ते सन्मान

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी

निफाड येथील श्री लक्ष्मी नागरी पतसंस्था येथे माणुसकी फाउंडेशन निफाड यांच्या वतीने आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून तसेच मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रल्हाद निकाळे सर यांच्या चतुर्थ स्मरणार्थ माणुसकी फाउंडेशन निफाड यांच्या वतीने आयोजित ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या नियोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये रयत शिक्षण संस्थेचे वनसगाव येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे आदर्श शिक्षक कुंदन कुमार जाधव सर यांना कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ,ज्येष्ठ साहित्यिक, लेखक, राष्ट्रपती पदक विजेते बी जी शेखर साहेब विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक पोलीस परिक्षेत्र यांच्या शुभहस्ते शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे अशी माहिती माणुसकी फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष पत्रकार सागर निकाळे यांनी दिली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा दूध उत्पादक संघाचे मा चेअरमन शिवाजी दादा ढेपले होते, व्यासपीठावर लासलगाव बाजार समितीचे सभापती डी के नाना जगताप, ह भ प ज्ञानेश्वर माऊली शिंदे राम कृष्ण हरी साधना आश्रम रुई, शिक्षक नेते संजय चव्हाण सर, ज्येष्ठ नेते भागवत आण्णा बोचरे देवगाव, रासाका चे मा चेअरमन शंकरराव कोल्हे, माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार सागर निकाळे, शौर्य रणरागिनी संपादिका गायत्री लचके, संपतराव रोटे ,नामदेवराव गायकवाड ,सामाजिक कार्यकर्ते दत्ता काका रायते, ॲड शेखर देसाई, पोलीस पाटील राहुल सोनवणे, वारकरी मंच प्रदेश प्रसिद्धी प्रमुख पत्रकार रामभाऊ आवारे सर, माणिक कुशारे सर आदी उपस्थित होते.
कुंदन कुमार जाधव सर यांना शैक्षणिक क्षेत्रात 12 वर्ष अनुभव, जिल्हास्तरीय विज्ञान परिषद (2016), जळगाव येथे विज्ञान प्रदर्शनात शिक्षक गटातून प्रथम क्रमांक, 2017- राज्यस्तरीय शिक्षण परिषद जळगाव येथे ‘विशेष गरजा असलेल्या बालकांचे शिक्षण’ विषयावर प्रबंध सादर व उत्कृष्ट प्रबंध म्हणून द्वितीय क्रमांक प्राप्त,2021- रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वनसगाव येथे शासनाकडून नियुक्ती करण्यात आली असुन 2022- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था(SCERT),पुणे द्वारे आयोजित तालुकास्तरीय प्रशिक्षणात सुलभक(ट्रेनर) म्हणून निवड,2023- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था (SCERT) द्वारे जिल्हा स्तरीय प्रशिक्षक म्हणून निवड, 2024- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था (SCERT),पुणे द्वारे इयत्ता 10वी साठी राज्यस्तरीय इतिहास व भूगोल विषय व्हिडिओ निर्मिती साठी निवड.व्हिडिओ दिक्षा App या शासकीय app वर प्रदर्शित, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,नाशिक(DIET) द्वारे जिल्हास्तरावर वरिष्ठ वेतन श्रेणी साठी सुलभक (ट्रेनर) म्हणून निवड. शासकीय जिल्हास्तरीय प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

Previous articleस्मार्ट मीटर विरुद्ध ग्रामीण भागात असंतोष ” बिल आहे की काय हो ” स्मार्ट र्मीटर काढण्याचा ग्रामसभेत घेतला ठराव.
Next articleनिफाड ला माणुसकी फाउंडेशन च्या वतीने ४५ गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here