आशाताई बच्छाव
आंबा बागांतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा: डॉ. अमोल विरकर
(आघार, मालेगाव प्रतिनिधी): ढगफुटीसदृश पाऊस झालेल्या ठिकाणच्या फळबागांमधील साचून राहिलेल्या पाण्याची बागेबाहेर ताबडतोफ विल्हेवाट लावणे महत्त्वाचे असल्याचे मत, छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलातील शास्त्रज्ञ डॉ.अमोल विरकर यांनी केली.
आघार, येथे ढगफुटीदृश पाऊस झालेल्या आंबा बागांना दिलेल्या भेटी प्रसंगी ते बोलत होते यावेळी त्यांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलातील प्राध्यापक डॉ . विपुल माळी, डॉ. उदय पवार प्रा. चेतन सोनवणे, डॉ. प्रवीण गिदगिरी, डॉ. सुनिता पोफळे डॉ. नेहा काळे, डॉ. जयश्री कडू, डॉ. प्रकाश तापकीर, डॉ. गणेश लहाने, डॉ. मयूर कचवे, डॉ. हर्षवर्धन मरकड, डॉ. अमृत खैरे, प्रा. विलास चव्हाण, असे शेतकरी प्रवीण पवार, नितीन कोर, सदाशिव हिरे, सोमनाथ पवार, सदाशिव निकम, सतीश निकम, राहुल निकम, भगवान निकम, अंबादास पवार, राम पवार आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. विरकर म्हणाले या पावसामुळे फळबाग शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
*मुळांची दमकोंडी:*
अनेक बागांत पाणी साचलेले असल्याने मुळ्यांची दमकोंडी होत आहे. त्यांची कार्यक्षमता ठप्प झाली आहे. झाडे कोरडी पडू लागतात आणि पुढच्या पिकाला फळही मिळत नाही. त्यामुळे झाडांना शॉक बसून झाडे दगवण्याची भीती आहे. बागांमधील पाण्याचा निचरा केल्यास बागेत वापसा स्थिती निर्माण होऊन झाडे दगावणार नाहीत. पाणी बाहेर काढल्यानंतर बागेत युरिया फेकून दिल्यास बागा लवकर वाफशावर येऊ शकतात,असा सल्ला डॉ. विरकर यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.