आशाताई बच्छाव
मा प्राचार्य सी डी रोटे सर माणुसकी फाउंडेशन च्या वतीने विशेष पुरस्काराने सन्मानित
मा विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक पोलीस परिक्षेत्र बी जी शेखर साहेब यांच्या शुभहस्ते सन्मान
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी
निफाड नगरीमध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून तसेच मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रल्हाद निकाळे सर यांच्या चतुर्थ स्मरणार्थ माणुसकी फाउंडेशन निफाड यांच्या वतीने आयोजित ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या नियोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये रयत शिक्षण संस्थेचे वनसगाव येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य तसेच आदर्श क्रीडा शिक्षक प्राचार्य सी डी रोटे सर (रुई ) यांचा कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ,ज्येष्ठ साहित्यिक, लेखक, राष्ट्रपती पदक विजेते बी जी शेखर साहेब विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक पोलीस परिक्षेत्र यांच्या शुभहस्ते शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभपुर्वक सन्मानित करण्यात आले आहे अशी माहिती माणुसकी फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष पत्रकार सागर निकाळे यांनी दिली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा दूध उत्पादक संघाचे मा चेअरमन शिवाजी दादा ढेपले होते, व्यासपीठावर लासलगाव बाजार समितीचे सभापती डी के नाना जगताप, ह भ प ज्ञानेश्वर माऊली शिंदे राम कृष्ण हरी साधना आश्रम रुई, शिक्षक नेते संजय चव्हाण सर, ज्येष्ठ नेते भागवत आण्णा बोचरे देवगाव, रासाका चे मा चेअरमन शंकरराव कोल्हे, माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार सागर निकाळे, शौर्य रणरागिनी संपादिका गायत्री लचके, संपतराव रोटे ,नामदेवराव गायकवाड ,सामाजिक कार्यकर्ते दत्ता काका रायते, ॲड शेखर देसाई, पोलीस पाटील राहुल सोनवणे, वारकरी मंच प्रदेश प्रसिद्धी प्रमुख पत्रकार रामभाऊ आवारे सर, माणिक कुशारे सर आदी उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राचार्य रोटे सर यांनी 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत अनेक पुरस्कार प्राप्त केले असून अनेक विद्यार्थी त्यांनी घडविले असून आज त्यांचे अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहे. तसेच क्रीडा क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य असून त्यांनी अद्याप पावेतो १००० विद्यार्थ्यांना राज्यस्तरापर्यंत पोहोचवून त्यांना पारितोषिक मिळून देण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत माणुसकी फाउंडेशन च्या वतीने त्यांना गौरविण्यात आले आहे.