आशाताई बच्छाव
अँड.जयश्री बी सोनवणे यांना राज्यस्तरीय “झाशीची राणी लक्ष्मीबाई ” पुरस्कार प्रदान *
संजीव भांबोरे
अहिल्यानगर –5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त,स्व.पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था,श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व पै.नाना डोंगरे व्यायाम शाळा निमगांव वाघा, ता.जि. अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने,आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2025 दि. 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त निमगाव वाघा येथील परिवार मंगल कार्यालयात संपन्न झाला.
या कार्यक्रमास सोजाई आदिवासी महिला विकास फॉउंडेशन सचिव अँड.जयश्री बी सोनवणे यांना देखील राज्यस्तरीय “झाशीची राणी लक्ष्मीबाई ” पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
अँड.जयश्री बी सोनवणे या दैनिक माझा मराठवाडा वृत्तपत्राच्या निवासी संपादिका, रिपब्लिकन आवाज न्यूजच्या उपसंपादिका, ब्लु स्टॉर्म टीव्ही न्यूज च्या वृत्तनिवेदिका त्यासोबतच त्या एक सामाजिक कार्यकर्त्या एक कवयित्री एक व्याख्यात्या अशा सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व असून अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम त्या करत असतात. या सर्व कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात राज्यस्तरीय तिसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे नियोजन करण्यात आले होते.या साहित्य संमेलनात अनेक साहित्यिक, कवी /कवयित्रीनीं आपला सहभाग नोंदवला होता. त्यातचं कवयित्री अँड.जयश्री सोनवणे यांनी देखील आपली *दारुडा नवरा* ही कविता सादर करुन लग्न झाल्यानंतर ज्या वेळी मुलीचा नवरा व्यसनाधीन असतो त्या वेळी त्या मुलीची आणि तिच्या पोराबाळांची संसाराची जी अवस्था होते ती आपल्या कवितेतून मांडली. आणि प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर हुभेहूब ते चित्र उभे राहिले. सर्व भावनिक होऊन निशब्द: झाले. त्या कवितेला सर्वांनी आपली पसंती दिली आणि त्याबद्दल त्यांचा सन्मानही करण्यात आला.
या कार्यक्रमात अँड.राजेश आसाराम कातोरे (अध्यक्ष, अ.नगर बार असोसिएशन),पल्लवी उंबरहंडे/देशमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक,श्री.राजेंद्र सुंदरदास फंड साहित्यिक व सामाजिक क्षेत्र,गिताराम नरवडे (ज्येष्ठ कवी),आनंदा साळवे (जेष्ठ कवी ),कवी आत्माराम शेवाळे,पत्रकार बाळासाहेब कोठुळे, साहित्यिक कवी रुपचंद शिदोरे,कार्यक्रमाचे आयोजक पै.नानाभाऊ किसन डोंगरे (अध्यक्ष)पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय. आदी मान्यवर यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.