आशाताई बच्छाव
व-हाणे गावचे भुमिपुत्र ज्येष्ठ मुद्दस्दी राजकारणी स्वर्गीय तुकाराम (भाऊ) शंकर पवार!
(स्मृतीदिनानिमित्त विशेष लेख)
वाचकहो,
काही व्यक्ती आपल्या कार्य कर्तृत्ववाने आपली छाप मागे सोडून जातात.अशा कर्तृत्ववान व्यक्तीना स्वतः च्या कार्याची कधीच जाहिरात करावी लागत नाही.एकंदरीत काय तर फुलाला आपल्या सुगंधाची कधीच ओळख सांगावी लागत नाही.अगदी त्याचप्रमाणे मालेगाव जवळील व-हाणे सारख्या खेडेगावात एक अनमोल रत्न उदयास आले.आणि बघता बघता सर्वदूर पर्यंत त्यांच्या कर्तबगारीचा डंका आजही त्यांच्या मरणोत्तरानंतरही आवर्जून सांगितला जातो.तुकाराम (भाऊ) शंकर पवार यांचा जन्म व-हाणे गावचा.ते खरे अर्थाने व-हाणेचे भुमिपुत्र म्हणून ओळखले गेले.गावाच्या सरपंच पदापासून ते अगदी जिल्हा व तालुका पातळीवरील त्यांनी विविध पदे भुषविले.पण कधी अहंकार,गर्व,न बाळगता सर्वसामान्य गोरगरीबांच्या पाठीशी उभे राहून प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होणार निर्गवी नेता पुन्हा होणे नाही.तुकाराम (भाऊ) शंकर पवार हे नावाजलेले पहिलवान होते.आजही त्यांच्या व-हाणे गावाची ओळख हि “तुकाराम पहिलवान”यांचे व-हाणे का? याच नावाने होते.केवढा मोठा आत्मसन्मान या व्यक्तीने एका शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन कमाविला याचे मला सतत कुतूहल व कौतुक वाटतं राहिले.माझ्या आयुष्यात मी तुकाराम (भाऊ) शंकर पवार यांना दोनदा तीनदाच भेटलो,मात्र भाऊंची कर्तव्यता व माणसांप्रती असलेली आपुलकीची भावना अगदी जवळून अनुभवल्याचा आनंद काही औरच होता.तुकाराम (भाऊ) शंकर पवार यांच्या गावाशेजारील शेतातच आमची भेट झाली, त्यावेळी मी दैनिक सकाळ वृत्तपत्रांच्या नाशिक आवृत्तीसाठी कौळाणे बातमीदार म्हणून काम करायचो आणि वृत्तपत्र एजन्सी देखील माझीच असल्याने, त्यामुळे दररोज न चुकता व-हाणे गावी माझे येणं जाणं सुरू होते.त्याचवेळी तुकाराम (भाऊ) शंकर पवार यांनी मला सांगितलेले शब्द आजही जसेच्या तसे कानात गुंजतात.दुस-या पेपरसाठी काय काम करतो.स्वतचे वृत्तपत्र सुरू कर समाजासाठी…तो शब्द मी देखील खरा करून दाखविला आणि “युवा मराठा”नावाचे वृत्तपत्र आज नव्व्यानव्व टक्के समाजासाठी तर एक टक्का बहुजन चळवळीसाठी चालवित आहे.हे सांगण्याचा उद्देश एवढाच की,एखादा चांगला मार्गदर्शक भेटला तर माणसाच्या आयुष्याचे सोने होते.तुकाराम (भाऊ) शंकर पवार यांनी मला केलेल्या मार्गदर्शनामुळे मी आज एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून कार्यरत आहे.व माझ्या आयुष्याला संधीचे सोने बनविणारा शिल्पकार आज आपल्यात नाही.याचे शल्य व जेवढे दुःख आहे.तेवढेच तुकाराम (भाऊ) शंकर पवार यांच्या कार्य कर्तृत्ववाचे गोडवे गाणारे आजही ग्रामीण भागात बघायला मिळाले तरी आत्मिक समाधान वाटते.आज ७ सप्टेंबर स्वर्गीय तुकाराम (भाऊ) पवार यांचा स्मृतिदिन! त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
राजेंद्र पाटील राऊत
संस्थापक अध्यक्ष युवा मराठा महासंघ महाराष्ट्र
संस्थापक अध्यक्ष लोकहित माहिती अधिकार पत्रकार व पोलीस संरक्षण संघटना महाराष्ट्र
संस्थापक अध्यक्ष आश्रयआशा फाऊंडेशन व-हाणे
मुख्य संपादक युवा मराठा न्यूजपेपर्स अँन्ड वेब न्यूज चॅनल महाराष्ट्र