आशाताई बच्छाव
लोकहित माहिती अधिकार पत्रकार व पोलीस संरक्षण संघटनेची स्थापना, राज्य कार्यकारिणी जाहीर: राजेंद्र पाटील राऊत
मालेगाव:- अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी क्रांतीकारी चळवळ उभीं करणारी राज्यस्तरीय संघटनशक्ती “लोकहित माहिती अधिकार पत्रकार व पोलीस संरक्षण संघटना” महाराष्ट्र क्रांतीदिनाच्या पुर्वसंध्येला स्थापना करण्यात आली असून,राज्य कार्यकारिणी घोषित करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांनी दिली.
लोकहित माहिती अधिकार पत्रकार व पोलीस संरक्षण संघटनेची राज्यस्तरीय कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहिर करण्यात आली आहे.संस्थापक सचिव श्रीमती आशाताई बच्छाव, रामभाऊ आवारे (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निफाड नाशिक), दिलीप पाटील (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष) पलूस सांगली, गोरखनाथ कुनगर (प्रदेश उपाध्यक्ष नाशिक),भारत पवार (प्रदेश उपाध्यक्ष ओझर), नरेंद्र पाटील (प्रदेश उपाध्यक्ष जळगाव), राजेंद्र होळकर (प्रदेश उपाध्यक्ष लासलगाव), प्रथमेश गायकवाड (प्रदेश राज्य सचिव ठाणे), उमेश कुलकर्णी (प्रदेश राज्य सचिव ओझर), फैय्याज मोमीन (प्रदेश राज्य कोषाध्यक्ष भिवंडी ठाणे), मुजाहिद मोमीन (अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष रायगड), शत्रुघ्न निकम(भटके विमुक्त जाती जमाती प्रदेश अध्यक्ष सोलापूर), सुर्यकांत भोर (महाराष्ट्र राज्य प्रसिध्दीप्रमुख पुणे), सुदर्शन बर्वे (नाशिक जिल्हा अध्यक्ष भगूर नाशिक)आदींची निवड करण्यात आली असून, लवकरच जिल्हा व तालुकास्तरावर नियुक्त्या जाहिर करण्यात येऊन, संघटनेच्या खेडोपाडी शाखा स्थापन केल्या जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष रामभाऊ आवारे यांनी सांगितले.तर नावनोंदणी शुल्क जमा केलेल्या पदाधिकाऱ्यांना लवकरच विमा प्रमाणपत्र आणि नियुक्ती व ओळखपत्र वितरीत केले जाणार असल्याची माहिती संघटनेच्या प्रसिध्दी पत्रकातून देण्यात आली आहे.