आशाताई बच्छाव
राजेंद्र पाटील राऊत यांच्याविषयी थोडंसं!……
लोक मला म्हणतात तू अन्यायाविरोधात बिनधास्त भिडतो. हे कौतुक माझ्या वाट्याला येण्याचं कारण म्हणजे राजेंद्र पाटील राऊत मुख्य संपादक युवा मराठा न्यूजपेपर्स अँन्ड वेब न्यूज चॅनल महाराष्ट्र हे गत चाळीस वर्षांपासून पत्रकारितेत आहेत.त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे.गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांसाठी लढून त्यांना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे.महाराष्ट्रातील अनेक नामांकित वृत्तपत्रात त्यांनी पत्रकार म्हणून सेवा केलेली आहे.त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले असून,ते सध्या युवा मराठा महासंघ महाराष्ट्र या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.तर आश्रयआशा फाऊंडेशन व-हाणे या बहुउद्देशीय संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत.त्यांनी अनेक लोकचळवळीमध्ये सहभाग घेऊन विविध आंदोलने केलेली आहेत. मी हे जे काही करु शकतोय, त्याचं सगळं श्रेय राजेंद्र पाटील राऊत सराचं आहे.
कौतुक आमच्या वाट्याला आणि हलाहल संपादकांना प्यावं लागतं. ते निमूटपणे सगळं पचवतात. आम्हाला मात्र चांगल्या गोष्टींसाठी प्रोत्साहन देतात. दिशा दाखतात. चुकलं तर कान धरतात. इमोशनल होवू नको असं कायम बजावतात. काळजीही करतात. स्वतः पडद्यामागे राहून. अगदी मनापासून सांगतोय, हे वाटतं तितकं सोपं नाहीय. आजच्या काळात तर नाहीच नाही. याला माणसाचं मन खूप मोठं लागतं.
पत्रकार होण्यासाठी धडपडत होतो, पण राजेंद्र पाटील राऊत सरांनी माझ्यासाठी दार उघडलं. मला संधी दिली. सगळं शिकून घे म्हणाले. रिपोर्टिंगची पहिली संधी त्यांनीच दिली. या जगात टॅलेंट असलेले कितीतरी लोक आहेत. पण संधी महत्वाची असते मित्रांनो. गावातून आलेल्या एका पोरावर त्यांनी विश्वास टाकला. ज्याला धड कपडे घातला येत नव्हते. नीट बोलता येत नव्हतं. प्रचंड न्यूनगंडग्रस्त होतो तरीही विश्वास दाखवला. असा मी एकटाच नाही, त्यांनी कितीतरी जणांना संधीचं दार उघडून दिलंय. मोठं केलंय. पण कधीच त्याची वाच्यता केली नाही. तो त्यांचा स्वभाव नाही.
✍🏻 आपला आजीवन ऋणी स्वप्निल बाप्पू देशमुख, राष्ट्रीय अध्यक्ष युवा मराठा महासंघ महाराष्ट्र, सहसंपादक युवा मराठा न्यूजपेपर्स अँन्ड वेब न्यूज चॅनल मु.पो.वानखेड,ता.संग्रामपूर जि.बुलढाणा