आशाताई बच्छाव
उद्योजकाची ८० लाखांची फसवणूक; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे
रिजाईस इव्हेंट ऑर्गनायझेशन कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे सांगून उद्योजकाची ८० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२४ ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान अहिल्यानगरमध्ये घडला आहे.
राहुल दर्शन जगताप, एंजल राहुल जगताप, सुशिला दर्शन जगताप (तिघे रा. सानपाडा, नवी मुंबई), ईब्राहीम प्रविण सम्युअल (रा. इंद्रपूर, भोपाळ, मध्यप्रदेश) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर राजेश ब्रिजलाल बन्सल (रा. सावेडी) असे फसवणूक झालेल्या व्यावयायिकाचे नाव आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत. आरोपींनी रिजाईस कंपनीस पैसे गुंतवल्यास चांगला नफा मिळेल, असे फिर्यादीस सांगितले. त्यानुसार फिर्यादीने गुंतवणूक केली होती.