आशाताई बच्छाव
लासलगांव बाजार समितीत डाळींब, ड्रॅगन फ्रुट व टोमॅटो लिलावास धुमधडाक्यात प्रारंभ
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी
लासलगांव येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या लासलगांव मुख्य बाजार आवारावर डाळींब, ड्रॅगन फ्रुट व टोमॅटो लिलावाचा शुभारंभ बाजार समितीचे उपसभापती संदीप (ललीत) दरेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील निफाड, चांदवड, येवला, सटाणा, देवळा, कळवण, मालेगांव, व सिन्नरसह ,अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगांव, राहुरी, राहाता व नेवासा तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगाखेड, वैजापुर व कन्नड आदि तालुक्यातील गावांमध्ये शेतकरी बांधवांनी डाळींब, ड्रॅगन फ्रुट व टोमॅटो ह्या शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली असल्याने त्यांना मालविक्रीची सोय व्हावी म्हणुन बाजार समितीतर्फे गेल्या 10 ते 11 वर्षापासुन डाळींब, मागील वर्षापासुन ड्रॅगन फ्रुट व 29 ते 30 वर्षापासुन टोमॅटो लिलावास सुरूवात केलेली आहे. प्रारंभी बाजार समितीचे उपसभापती संदीप (ललीत) दरेकर यांचेसह उपस्थित बाजार समितीचे सदस्य, शेतकरी, अडते व व्यापारी यांच्या शुभहस्ते डाळींब, ड्रॅगन फ्रुट व टोमॅटो क्रेटस् चे विधीवत पुजन करण्यात आले. मुहूर्तावर गोंदेगांव, ता. निफाड येथील शेतकरी भाऊसाहेब साळवे यांचा डाळींब हा शेतीमाल रू. 3,700/- प्रती क्रेटस् ह्या दराने गुलजार फ्रुट ॲन्ड व्हेजीटेबल कंपनी यांनी खरेदी केला. तसेच गोंदेगांव, ता. निफाड येथील शेतकरी बालाजी साळवे यांचा ड्रॅगन फ्रुट हा शेतीमाल रू. 2,100/- प्रती क्रेटस् ह्या दराने गुलजार फ्रुट ॲन्ड व्हेजीटेबल कंपनी यांनी खरेदी केला. त्याचप्रमाणे शिवापुर, ता. निफाड येथील शेतकरी विक्रम जगताप यांचा टोमॅटो हा शेतीमाल रू. 2,500/- प्रती क्रेटस् ह्या दराने शिवशंभु ट्रेडर्स यांनी खरेदी केला. सदर लिलाव शुभारंभ प्रसंगी दरेकर यांनी आपल्या मनोगतात लासलगांव बाजारपेठ कांद्याबरोबर मका, सोयाबीन, डाळींब, ड्रॅगन फ्रुट, टोमॅटो व सर्व प्रकारचे फळे, भाजीपाल्यासाठीही नावारूपास येत आहे. डाळींब, ड्रॅगन फ्रुट व टोमॅटो शेतीमालास स्पर्धात्मक बाजारभाव मिळावे म्हणुन डाळींब, ड्रॅगन फ्रुट व टोमॅटो खरेदीदार / निर्यातदार व्यापा-यांची संख्या वाढविण्यावर बाजार समितीचा भर राहणार असुन डाळींब, ड्रॅगन फ्रुट व टोमॅटो शेतमाल उत्पादकांनी आपला शेतमाल योग्य प्रतवारी करून विक्रीसाठी आणावा. वजनमापानंतर शेतकरी बांधवांना लगेचच रोख पेमेंट देण्यात येणार आहे. तसेच डाळींब, ड्रॅगन फ्रुट व टोमॅटो लिलावात नव्याने सहभागी होऊ इच्छीणा-या खरेदीदार / निर्यातदार व्यापाऱ्यांनी लायसेन्सबाबतच्या सर्व अटी पुर्ण केल्यास त्यांना तात्काळ परवाना देऊन पॅकींग व साठवणुकीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
@ लिलावाचे दिवशी दिवसभरात एकुण 135 क्रेटस् मधुन डाळींब हा शेतीमाल विक्रीस आला. त्यास कमीत कमी रू. 1,100/-, जास्तीत जास्त रू. 3,700/- व सरासरी रू. 2,500/- प्रती क्रेटस् भाव मिळाला. तसेच 25 क्रेटस् मधुन ड्रॅगन फ्रुट हा शेतीमाल विक्रीस आला. त्यास कमीत कमी रू. 1,000/-, जास्तीत जास्त रू. 2,100/- व सरासरी रू. 1,900/- प्रती क्रेटस् भाव मिळाला. त्याचप्रमाणे 545 क्रेटस् मधुन टोमॅटो हा शेतीमाल विक्रीस आला. त्यास कमीत कमी रू. 500/-, जास्तीत जास्त रू. 2,500/- व सरासरी रू. 1,500/- प्रती क्रेटस् भाव मिळाला.
डाळींब, ड्रॅगन फ्रुट व टोमॅटो उत्पादकांनी आपला शेतीमाल मोठा (सुपर / एक नंबर), मध्यम, लहान (गोल्टी), बदला (बिलबिला, तडकलेला, खरचटलेला), किडका, पिचका अशी योग्य प्रतवारी करून 20 किलोच्या क्रेटस् मध्ये विक्रीस आणावा असे आवाहन सदस्य सचिव नरेंद्र वाढवणे यांनी केले. याप्रसंगी बाजार समितीचे सदस्य भिमराज काळे, छबुराव जाधव, सौ. सुवर्णा जगताप, प्रविण कदम, रमेश पालवे, सहसचिव प्रकाश कुमावत, सर्व लिलाव प्रमुख काकासाहेब जगताप, पंकज होळकर, प्रभारी हिरालाल सोनारे व संजय होळकर, सागर कुऱ्हाडे, गणेश आहेर, संदीप शेलार, हर्षवर्धन होनराव, लाला ठाकरे, दिपक जेऊघाले, कृष्णा जगताप, सागर सोनवणे, सुशिल जोशी, डाळींब व्यापारी अखलाख अन्सारी, मुजम्मील अन्सारी, गफार नाईकवाडी, सैय्यद मोहसीन सैय्यद मुश्ताक, जिब्राईल नाईकवाडी, तौसीफ बागवान, तबरेज शेख, राजु सैय्यद, कौसीक बागवान, टोमॅटो व्यापारी विष्णु सरोदे, बापु धरम, मच्छींद्र काळे, दिपक जगताप, हैदर पठाण, सागर आहेर, संजय साळुंके, गणेश देशमुख, नंदु जाधव, आसिफ पठाण, सुधीर मोरे, सागर देशमुख, शरद हिरे, दिपक केदारे, धनंजय मोरे यांचेसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.