आशाताई बच्छाव
लासलगाव ची आंतरराष्ट्रीय स्केटींग क्रीडापटू कु दुर्गा गुंजाळ ला भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम पुरस्कार जाहीर
पुणे येथे २६ जुलै रोजी पुरस्कार वितरण सोहळा
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी
लासलगाव तालुका निफाड येथील जय जनार्दन अनाथ व वृद्धाश्रमाचे सचिव दिलीप बाबुराव गुंजाळ व भागवताचार्य हभप संगीता माई गुंजाळ यांची कन्या कु दुर्गा दिलीप गुंजाळ हिस ए डी फाउंडेशनच्या वतीने सामाजिक ,सांस्कृतीक, शैक्षणिक, क्रिडा क्षेत्रात नाव लौकीक मिळविलेल्या आंतरराष्ट्रीय स्केटीग खेळाडू कुः दुर्गा दिलीप गुंजाळ हिने क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल भारतरत्न डॉ ए पी जी अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला आहे.
२६ जुलै २०२५ रोजी पुणे मंगल कार्यालयात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. दुर्गा दिलीप गुंजाळ हिची निवड ए डी फाऊडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशोकजी गोरड यानी निवड केली आहे.कु दुर्गा ने संपूर्ण भारत, महाराष्ट्र व थायलंड येथे स्केंटीग खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत भारताचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले असुन आपल्या स्केटींग खेळातून मिळालेले पैश्यातुन अनाथ गोरगरीब वृद्धांना दवाखाना करणे ,वाॉकर घेऊन देणे, केस कापणे असेही दुर्गाचे सामाजिक कार्य आहे. त्याच बरोबर भाकड गायीचा दवाखाना करणे ,चारा विकत घेऊन त्यांना चारणे हे कार्य ती १२ व्या वर्षी करत आहे म सामाजिक कार्याची आवड स्केटींग खेळामध्ये आपल्या गुरुचे नाव उंच केले.ती विसा स्केंटीग अॅकडमीची खेळाडू असुन तिचे कोच ( गुरु ) शाम सर चौधरी आहे. कु दुर्गा दिलीप गुंजाळ हिस भारतरत्न डॉ ए पी जी अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार झाल्या बद्दल जय जनार्दन अनाथ व वृद्ध आश्रम ,संस्थापक खंडेश्वरी तपस्वी प पु स्वामी वासुदेवनंदगिरी गुरु मौनगिरी बहुरुपी महाराज ,महाराष्ट्र पिठाधेश्वर श्री श्री १oo८ महामंडलेश्वर शिवगीरीजी महाराज ,भारत माता आश्रमाचे प पु स्वामी जनेश्वरानंदगिरी महाराज, साईबाबा चालल्या सेवाभावी संस्थेच्या संस्थापक रत्नाताई चांदगुडे पाटील, प्राचार्य सी डी रोटे सर,ब्राह्मण महासंघाच्या सौ स्मिताताई कुलकर्णी, वारकरी मंच प्रदेश प्रसिद्धी प्रमुख पत्रकार रामभाऊ आवारे सर, मा चेअरमन राजा बाबा होळकर, विसा स्केंटीग अॅकडमी कोच व सर्व विद्यार्थी, एन व्ही पी कॉलेज सर्व सभासद प्राचार्य व शिक्षक इतर कर्मचारी, सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक इतर कर्मचारी दुर्गाचे आई- वडिल यांनी अभिनंदन करून भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.