आशाताई बच्छाव
सेवानिवृत्त सहायक पोलिस उपनिरीक्षक ए.के.गायकवाड आणि युवा मराठा न्यूजचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांना “उत्कृष्ट कर्तव्यदक्ष २०२५”पुरस्कार जाहीर..!
मालेगाव, प्रतिनिधी श्रीमती आशाताई बच्छाव:- येथील क्राँईम न्यूज डायरी चँनलच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार सन्मान सोहळ्यानिमित्त रोझे ता.मालेगाव येथील रहिवासी व आडगाव पोलिस स्टेशनचे सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक ए.के.गायकवाड व युवा मराठा न्यूज चॅनलचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांना “उत्कृष्ट कर्तव्यदक्ष २०२५” पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती क्राँईम डायरी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक प्रवीण पवार यांनी दिली.
क्राँईम डायरी न्यूज चॅनलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सदर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, पोलिस सेवेत कार्यरत असलेल्या विविध पोलीस स्टेशनच्या अधिका-यांचा व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राजेंद्र पाटील राऊत यांचा तर पोलिस सेवेतून सेवानिवृत्त झालेले सहायक पोलिस उपनिरीक्षक ए.के.गायकवाड यांना त्यांनी केलेल्या सेवाभावी कार्याबद्दल सदरचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
सदर पुरस्काराचे वितरण गुरुवार दिनांक २४ जुलै २०२५ रोजी क्राँईम डायरी न्यूज चॅनलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सोयगाव परिसरातील मित्रनगर येथे एका समारंभात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार असून, गायकवाड व राऊत पाटील यांना जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल अनेकांनी अभिनंदन केले आहे.