आशाताई बच्छाव
अमरावती शहरात मध्य प्रदेशातील स्वस्त दारूचे विदेशी बाटलीतून विक्री : गुन्हे शाखेने 3 लाख १४ हजाराची दारू जप्त केली. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. मध्य प्रदेशात मिळणारी स्वस्त दारू महाराष्ट्रातील अमरावती आणायची व ही दारू महागड्या इंग्रजी दारूच्या बाटल्या मध्ये भरायची आणि शहर व जिल्ह्यात विक्री करायचे हा गोरख धंदा मागील काही दिवसापासून अमरावती शहरात सुरू होता दरम्यान गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने मंगळवारी वाटर रिफीलीग गोदामावर दहा टाकून ३ लाख १४ हजाराची दारू जप्त करून हा गोरख धंदा उघड केला यावेळी दोघांना ताब्यात घेतले आहे. राज सुनील शाहू वय ३५ मस्तानगंज अमरावती व गौरव उर्फ विकी किशोर मातले वय ३८ संतोषी नगर अमरावती अशी आरोपींची नावे आहेत गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने दुपारी एका वाहनातून दारूची अवैध वाहतूक सुरू असताना पकडले ही दारू विदेशी असल्याचे लक्षात आले. नागपूर वरून बोलावलेले सिलिंग चे साहित्य स्वस्त दारू महागड्यांच्या ब्रँडच्या रिकाम्या बॉटलमध्ये भरल्यानंतर त्यावर शील करणे आवश्यक आहे त्यासाठी शाहू हा नागपुरातील एका व्यक्तीकडून शीर करण्यासाठी आवश्यक साहित्य बोलावत होता त्यामुळे पोलिसांनी नागपूरवरून सिलिंग साहित्याचा पुरवठा करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे रिफिलिंग प्रकरणी सखोल तपास करणार आहेत राज शाहू हा mp3 स्वस्त धरून शहरातील गोदामात द्या महागडा विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्यामध्ये भरत होता त्यानंतर ही दारू शहर परिसरात व धाब्यावर इतर ठिकाणी विक्री करत होता असेही कळले व चौकशी समोर येत आहे या प्रकरणात तपास करण्यात येईल असे आमच्या प्रतिनिधींना संदीप चव्हाण पीआय क्राईम ब्रँच युनिट दोन यांनी सांगितले.






