आशाताई बच्छाव
अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी लोकहित माहिती अधिकार पत्रकार पोलिस संरक्षण संघटनेत सामील व्हा
संस्थापक अध्यक्ष राजेंद्र राऊत पाटील यांचे आवाहन
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी
अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यापेक्षा अन्यायाविरुद्ध आवाज न उठविणारा अधिक गुन्हेगार असतो त्यामुळे गुन्हेगारांची संख्या वाढत असून त्याचा सर्वसामान्य घटकांना परिणाम भोगावा लागत आहे. भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार लोकशाही मार्गाने संघटनेचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात आणि खेडोपाडी शाखा स्थापन करून वाढविण्यासाठी लोकहित माहिती अधिकार पत्रकार पोलीस संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य क्रांती दिनाचे औचित्य साधत 9 ऑगस्ट ला स्थापना होणार असून अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी संघटनेत सक्रिय सहभागी व्हा असे आवाहन लोकहित माहिती अधिकार पत्रकार संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष राजेंद्र राऊत पाटील मालेगाव यांनी केले आहे.
माहिती अधिकार कायदा २००५ चा पुरेपूर वापर करून समाजात सुरू असलेल्या अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरुध्द क्रांतीकारी लढा उभारून जनजागृती करण्यात येईल आणि सदस्य झालेल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, प्रबोधन करुन लोकशाही बळकट करण्यासाठी कार्य केले जाईल.तसेच पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्त्याच्या हक्कासाठी संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी आवाज उठवून लढा मजबूत केला जाईल. पोलिस बांधवांच्या सुख दुःख, अडीअडचणी, समस्या, आरोग्य, शिक्षण व इतर विविध प्रश्नांवर कार्य करण्यासाठी लोकहित माहिती अधिकार पत्रकार पोलिस संरक्षण संघटना महाराष्ट्र ची स्थापना होत असून आहे.संघटनेत सहभागी होणाऱ्या सभासदांना ओळखपत्र (आयडी कार्ड) व एक वर्षाचा अपघाती विमा देण्यात येईल. संपूर्ण महाराष्ट्रभर संघटनेचे कार्यक्षेत्र असून, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात आणि खेडोपाडी शाखा स्थापन करण्यात येणार आहेत.तरी लोकशाही मार्गाने कार्य करुन आपणही संघर्षाचे शिलेदार व्हा!अन्याय्य करणा-यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो.चला रणशिंग फुंकु या नव्या सुराज्य निर्मितीसाठी एक होऊ या. अधिक माहिती व संपर्क राजेंद्र पाटील राऊत संस्थापक अध्यक्ष 9850447685/9923362030 या नंबरवर करावा