Home नाशिक प्रांत अधिका-यांच्या तत्परतेने होतकरू विद्यार्थ्यांला मिळाला इंजिनिअरिंग ला प्रवेश

प्रांत अधिका-यांच्या तत्परतेने होतकरू विद्यार्थ्यांला मिळाला इंजिनिअरिंग ला प्रवेश

105

आशाताई बच्छाव

1001709402.jpg

प्रांत अधिका-यांच्या तत्परतेने होतकरू विद्यार्थ्यांला मिळाला इंजिनिअरिंग ला प्रवेश

इंजिनिअरिंग प्रवेशाचा होता शेवटचा दिवस

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी

तांत्रिक अडथळ्यांमुळे सरकारी सेवा वेळेवर मिळत नसल्याची तक्रार अनेकदा ऐकू येते. पण, निफाड आणि दिंडोरी प्रांत कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि तत्परता यामुळे एका होतकरू विद्यार्थ्याचे भविष्य उजळले.
कुणाल आवारे या निफाड तालुक्यातील शिरवाडे येथील विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग च्या पुढील वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र आवश्यक असलेला जात दाखला अद्याप मिळालेला नव्हता. आज म्हणजेच दि.१५ जुलै हा प्रवेशाचा अंतिम दिवस होता. मात्र निफाड प्रांत कार्यालयात काही तांत्रिक अडचणीमुळे दाखला तयार होऊ शकत नव्हता. त्यामुळे प्रवेशाचा शेवटचा दिवस हातातून निसटणार का? अशी भीती कुणाल आणि कुटुंबीयांना वाटत होती.
या परिस्थितीत निफाड प्रांत कार्यालयातील कर्मचारी संदिप मेढे यांच्याशी संपर्क साधण्यात आला, त्यांनी अर्ज मंजूर करून दाखल्यांसाठी असणारा थम हा दिंडोरी उपविभागीय कार्यालयाकडे असल्याने दिंडोरी प्रांत कार्यालयातील सावजी भाऊसाहेब यांच्याशी संपर्क साधला. सावजी भाऊसाहेब यांनी सर्व परिस्थिती दिंडोरी प्रांताधिकारी आप्पासाहेब शिंदे यांना सांगितली. दिंडोरी प्रांताधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी आवश्यक ती कार्यवाही करत तातडीने आवश्यक दाखला तयार करून विद्यार्थ्याला दिला गेला.
या प्रसंगामुळे कुणालला वेळेपूर्वी जात दाखला मिळाला आणि त्याचा प्रवेश निश्चित झाला. तणावपूर्ण क्षणांमध्ये दाखला हाती पडताच त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटले. ही घटना शासकीय यंत्रणेमधील संवेदनशील अधिकाऱ्यांचे उत्तम उदाहरण ठरते. वेळेच्या मर्यादेत काम करत एका विद्यार्थ्याचे आयुष्य घडवण्याचे काम या अधिकाऱ्यांनी केले. प्रांताधिकारी आप्पासाहेब शिंदे आणि सावजी भाऊसाहेब, संदिप मेढे यांची तत्परता नक्कीच शासकीय वर्तणुकीला छेद देणारी आहे.
सरकारी यंत्रणा केवळ कागदोपत्री प्रक्रिया न राहता, माणुसकीच्या भावनेने चालवली गेली तर अनेकांची स्वप्ने सत्यात उतरू शकतात हे या प्रसंगातून स्पष्ट झाले आहे