Home उतर महाराष्ट्र साक्री येथे युवा कौशल्य विकासावर भर जागतिक कौशल्य दिनानिमित्त कार्यक्रम

साक्री येथे युवा कौशल्य विकासावर भर जागतिक कौशल्य दिनानिमित्त कार्यक्रम

86

आशाताई बच्छाव

1001709381.jpg

साक्री येथे युवा कौशल्य विकासावर भर

जागतिक कौशल्य दिनानिमित्त कार्यक्रम

धुळे नंदुरबार संदीप वसंतराव पाटील ब्युरो चीफ 
साक्री : प्रत्येक विद्यार्थ्याला स्वयंपूर्ण व रोजगारक्षम करण्यासाठी कौशल्यपूर्ण शिक्षण देणे गरजेचे असून, करिअर कट्ट्याच्या माध्यमातून युवा कौशल्य क्षम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे मत महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी व्यक्त केले.

विद्या विकास मंडळाच्या सीताराम गोविंद पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित ऑनलाइन कार्यक्रमात ते बोलत होते. भारताची ओळख जगाला कौशल्यपूर्ण मानव

करिअर संसद शपथविधी सोहळा

या कार्यक्रमात जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त करिअर संसद शपथविधी सोहळा संपन्न झाला. प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे यांनी करिअर कट्टा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिगत विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असल्याचे नमूद केले. करिअर संसद निवडणुकीत विजयी झालेल्या मुख्यमंत्री रिया ठाकरे, नियोजन मंत्री विशाखा भामरे, कायदे व शिस्तपालन मंत्री मानसी गांगुर्डे, सामान्य प्रशासन मंत्री वेदश्री माळी, माहिती व प्रसारण मंत्री प्रवीण पाटील, उद्योजकता विकास मंत्री जयेश बोरसे, रोजगार स्वयंरोजगार मंत्री कुणाल बेडसे, कौशल्य विकास मंत्री प्रतीक्षा सोनवणे, संसदीय कामकाज मंत्री मीनाक्षी बोरसे, महिला व बालकल्याण मंत्री तेजस्विनी साळुंके आणि सदस्य साक्षी पगारे यांनी शपथ घेतली. डॉ. चंद्रकांत कढरे व प्रशांत बोरसे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

पुरविणारा देश म्हणून व्हावी, या दृष्टीने करिअर कट्टयांतर्गत प्रयत्न सुरू असल्याचे शितोळे यांनी सांगितले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे, उपप्राचार्य डॉ. अनंत पाटील, करिअर कट्टधाचे महाविद्यालयीन

समन्वयक डॉ. धनंजय पाटील व डॉ. अनुप मोरे उपस्थित होते. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान, युवा कौशल्य क्षमता तसेच करिअर कट्टा याविषयांवर मार्गदर्शन करत स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले.