Home उतर महाराष्ट्र श्रीरामपूरात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा दिमाखात दाखल

श्रीरामपूरात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा दिमाखात दाखल

69

आशाताई बच्छाव

1001670180.jpg

श्रीरामपूर दिपक कदम– गेली चार दशके शहराचा सन्मानबिंदू ठरलेल्या आणि प्रतीक्षेत असलेल्या श्रीरामपूर शहरातील जनतेच्या उत्कट भावनांना अखेर न्याय मिळाला असून,छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा मोठ्या दिमाखात आणि जयघोषात शहरात दाखल झाला.नेहरू मार्केट येथील नियोजित स्मारक स्थळी ढोल-ताशांच्या गजरात पुतळ्याचे आगमन झाले. शहरातील शेकडो शिवप्रेमींनी उपस्थित राहून महाराजांच्या या आगमनाचे जल्लोषात स्वागत केले.पुतळा आगमनाच्या निमित्ताने संपूर्ण परिसर भगव्या पताका,घोषणांनी आणि देशभक्तीपर वातावरणाने भरून गेला होता.छत्रपती शिवाजी महाराज की जय ! च्या घोषणांनी परिसर निनादून गेला.शहरातील नागरिक,महिलावर्ग,विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पुतळा आगमन सोहळ्यात सहभाग घेतला.

मात्र, या आनंदमयी क्षणातही राजकारणाची किनार दिसून आली.पुतळा स्थापनेनंतर पूजनाच्या कार्यक्रमावरून भाजपा गटात वाद निर्माण झाला.भाजपचे मा. तालुकाध्यक्ष दीपक पटारे आणि विद्यमान भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर या दोन गटांने स्वतंत्रपणे पूजन करून आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.मानवाच्या स्वार्थी दृष्टिकोन येथे स्पष्ट दिसून येत होता. त्यामुळे शिवप्रेमीं मध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत असून, “छत्रपतींच्या पुतळ्यात तरी राजकारण आणू नका,” अशी भावना शहरातील सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली.या पुतळा स्थापनेमुळे शहराला एक नवा गौरव प्राप्त झाला असून, शिवप्रेम, इतिहास आणि संस्कृतीचे प्रतीक म्हणून हे स्मारक भविष्यात प्रेरणास्थान ठरेल,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र, अशा ऐतिहासिक क्षणात एकतेचे दर्शन घडण्या ऐवजी राजकीय गटांमध्ये वर्चस्वाच्या स्पर्धेमुळे निर्माण झालेली दुःखद परिस्थिती खेदजनक असल्याची प्रतिक्रिया सामाजिक स्तरावरून व्यक्त होत आहे कारण बाप चोरणारी टोळी सध्या राज्यात सक्रिय आहे.

यावेळी श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, बांधकाम विभागाचे अधिकारी सूर्यकांत गवळी,भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंकी, गणेश जाधव, मा. तालुकाध्यक्ष दीपक पटारे, मा. नगराध्यक्ष संजय फंड, मा. उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, नगरसेवक शामलिंग शिंदे, अभियंता संदीप चव्हाण, कामगार नेते नागेश सावंत, संजय गांगड, शंकरराव मुठे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे गिरीधर आसने, नाना शिंदे, महेंद्र पटारे, मा. नगरसेवक आशिष धनवटे,चरण चव्हाण भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड आदिसह मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.

Previous articleसाक्री : ३४ ग्रा.पं.चे सरपंचपद महिला राखीव
Next articleशां. ज.पाटणी विद्यालयाच्या बाल वारकऱ्यांची दिंडी.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.