आशाताई बच्छाव
साक्री : ३४ ग्रा.पं.चे सरपंचपद महिला राखीव धुळे नंदुरबार संदीप पाटील ब्युरो चीफ
इंदवे साक्री तालुक्यातील बिगर अनुसुचित क्षेत्रातील ६८ ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी काल (दि.३) दुपारी ३ वाजता साक्री तहसिल कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. यात ३४ ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंचपदाचे आरक्षण निश्चित झाले असून तेथे सन २०२५-२०३० या पंचवार्षिक कालावधीसाठी महिला राज असणार आहे.
या सभेच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी रोहन कुवर होते तर तहसीलदार साहेबराव सोनवणे, निवासी नायब तहसीलदार तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. पाच वर्षीय सोहम अनिकेत भामरे (रा. साक्री) याच्या हस्ते चिठ्ठया काढण्यात आल्या. या सोडतीत २०२५ ते २०३०
या पंचवार्षिक कालावधीसाठी अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्ग अशा विविध घटकांमध्ये आरक्षणाचे वाटप करण्यात आले. त्यानुसार, अनुसुचित जाती प्रवर्गातील लोणखेडी व कळंभीर येथे महिला तर वसमार ग्रामपंचायतीचे सरपंच पद खुले असणार आहे. तसेच अनुसुचित जमाती प्रवर्गातील मलांजन, निळगव्हाण, नाडसे, शेणपूर, विटाई, बळसाणे अनुसुचित जमाती महिला तर आष्टाणे, कोकले, आयणे/मळखेडे, म्हसदी प्र. नेर, नागपूर (व), अक्कलपाडा ग्रा.पं.चे सरपंचपद
अनुसुचित जमातीसाठी आरक्षीत झाले. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित ग्रामपंचायती
कासारे, गणेशपूर, हट्टी बुद्रुक घाणेगाव, चिचखेडे, निजामपूर, वाजदरे, छडवेल
(प), पैचाळे, दुसाणे येथे मागास प्रवर्ग तर भडगाव (व), तामसवाडी, धाडणे, फोफादे, अंबापूर, बेहेड, सैय्यदनगर /इच्छापुर, नांदवन, काळगाव येथे मागास प्रवर्ग महिला आरक्षण निश्चित झाले.
सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित ग्रामपंचायती
खोरी, प्रतापपुर, उभंड, दातर्ती/गंगापुर, वर्धाणे, आखाडे, शेवाळी दातर्ती, कढरे, जैताणे, मालपूर, धमणार, जामदे, छावडी/आमोदे, नवडणे/सायणे, म्हसाळे, छाईल, ककाणी/भडगाव, भाडणे/गोदास येथे सर्वसाधारण तर उंभर्टी, फोफरे, इंदवे, उंभरे, भामेर, भागा भागापूर, सातरपाडा, दिघावे, कावठे, हट्टी खुर्द, वेहेरगाव/रोजगाव, महिर, शेवाळी मा., उभरांडी/होडदाणे, खुडाणे, दारखेल, सतमाने येथे सर्वसाधारण महिला सरपंच पदाचे आरक्षण निश्चित झाले.






