आशाताई बच्छाव
अवैध गुटख्याच्या साठ्यावर पोलिसांचा छापा; ११ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे
श्रीगोंदा तालुक्यात अवैध गुटख्याची वाहतूक तसेच गुटख्याचा साठा करणाऱ्यावर विशेष पोलीस पथकाने छापा टाकून ११ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थापन केलेल्या विशेष पोलीस पथकाचे पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांना मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथील इनामदार वस्तीजवळ एक गुटख्याची वाहतूक करणारा टेंम्पो असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता अवैध गुटख्याची साठवणूक गोडावून मध्ये केली असल्याचे तपासात पुढे आले. पोलीस पथकाने गोडाऊनचा शोध घेऊन गुटखा हस्तगत करून ११ लाख ५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.