Home नांदेड जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत सहकार दिंडीचे आयोजन.

जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत सहकार दिंडीचे आयोजन.

100

आशाताई बच्छाव

1001669933.jpg

जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत सहकार दिंडीचे आयोजन.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड :- आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 चे अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयामार्फत सहकार दिंडीचे आज आयोजन करण्यात आले होते. या दिंडीमार्फत सहकार से समृध्दी तसेच सहकारातील विविध उपक्रमाची जनजागृती करण्याच्या हेतुने सहकार दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उप जिल्हाधिकारी सामान्य अजय शिंदे, जिल्हा उपनिबंधक अशोक भिल्लारे, सहायक निबंधक प्रशासन योगेशकुमार बाकरे आदीची उपस्थिती होती. ही दिंडी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यत काढण्यात आली. या दिंडीत कृषि उत्पन्न बाजार समिती, सहकारी संस्था, सहकारी बँका, सहकारी पतसंस्था व जिल्हृयातील सर्व गटसचिव, अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग घेतला. सकाळी 10 वा. दिंडी सुरुवात झाली. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. या कार्यक्रमास उप जिल्हाधिकारी सामान्य अजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी मार्गदर्शन केले व सहकार विभागाच्या विविध उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

Previous articleवादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ; हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना.
Next articleमुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांना सामान्य लोकांच्या वतीने निरोप!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.