आशाताई बच्छाव
नैताळे विद्यालयात ज्ञानोबा- माऊली- तुकाराम च्या जयघोषात दिंडी सोहळा
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी वारकरी वेषात
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी
हल्लीच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे आणि एकतेचा संदेश देणे ही काळाची गरज आहे हा मानस समोर ठेऊन मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संचलित जनता विद्यालय नैताळे येथे शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच शालेय स्कूल कमिटी यांच्या मार्गदर्शनाने जनता विद्यालय नैताळे शाळेमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने ‘भव्य दिंडी सोहळा’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करून या पवित्र दिंडी सोहळ्याचा आनंद घेतला.शाळेच्या प्रांगणात सकाळी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि विठ्ठलाच्या पालखीचे दीपप्रज्वलन स्कूल कमिटी चे अध्यक्ष श्री.संजय विश्वनाथ बोरगुडे यांच्या हस्ते तसेच प्रतिमा पूजन ह.भ.प. .भाऊसाहेब घुमरे,सौ अलकाताई घुमरे तसेच पुष्पहार अर्पण राजू नाना विघे यांनी करून ह.भ.प श्री.शंकर भवर यांनी श्रीफळ वाढविले. या प्रसंगी चोपदार श्री. मच्छिंद्र पिठे, झेंडेकरी श्री.संभाजी मोरे,श्री.शिवाजी बोरगुडे व विनेकरी जालिंदर मोरे होते.सदर दिंडी सोहळ्यामध्ये,विद्यार्थ्यांनी विठ्ठल- रुक्मिणीची भक्तिपूर्ण गाणी आणि अभंग व भक्तीगीते यांचे गायन करून उपस्थित सर्व भाविक व पालक व विद्यार्थी यांना मंत्रमुग्ध केले.सदर दिंडी सोहळ्यामध्ये पर्यावरण रक्षणाचे महत्व सांगणारी वृक्षदिंडी तसेच ग्रंथांचे महत्व विषद करणारी ग्रंथ दिंडी,आरोग्य दिंडी अशा विविध संदेशपर दिंडींचे आयोजन सदर सोहळ्यामध्ये करण्यात आले होते. ही दिंडी शाळेच्या प्रांगणातून निघाली व नैताळे गावाच्या महामार्गालगत असणाऱ्या मतोबा मंदिर,विठ्ठल रुक्मिणी मंदिर,महादेव मंदिर, गाजरवाडी रोड या ठिकाणी नेण्यात आली.सदर दिंडी सोहळ्यामध्ये इयत्ता आठवी ते दहावीच्या दीडशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. यामध्ये विद्यार्थ्यांनी “ज्ञानोबा – माऊली तुकाराम” या जयघोषांमध्ये संपूर्ण नैताळे गावचा परिसर दुमदुमून टाकला.यावेळी दिंडीत सहभागी,वारकरी वेशभूषेतील मुली व मुले यांनी फुगडी खेळाचा आनंद घेतला.जनता विद्यालय नैताळे शाळेचे प्रांगण तसेच गावामध्ये मोकळ्या जागेत रिंगण करून विद्यार्थ्यांनी हरिनामाच्या गजरात फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.या वेळी शालेय स्कूल कमिटी सदस्य नवनाथ माऊली बोरगुडे यांनी बोलताना आषाढी एकादशीच्या परंपरेचे महत्त्व स्पष्ट केले आणि वारकऱ्यांच्या भक्तीमय यात्रा,वारीचे सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व विद्यार्थ्यांना सांगून,संतांची शिकवण ही आपले जीवन खऱ्या अर्थाने चांगले बनवते असे प्रतिपादन केले,व सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.दिंडी सोहळ्याचे आयोजन व नियोजन शालेय सांस्कृतिक विभागाने केले.यावेळी श्री.संजय तात्या विश्वनाथ बोरगुडे,श्री.नवनाथ माऊली बोरगुडे,श्री.आप्पासाहेब बोरगुडे,सौ.वर्षाताई बोरगुडे,श्री.शंकर घायाळ,श्री.संतोष कोटकर,श्री.शंकर कोल्हे,श्री.शंकर भवर,श्री.राजू नाना विघे,श्री.शंकर घायाळ,श्री.दादा बोरगुडे, श्री अरविंद बोरगुडे,श्री.संजय घायाळ, श्री.अरुण घायाळ,श्री.बापूसाहेब बोरगुडे,श्री.संजय बोरगुडे,श्री.राजेंद्र निवृत्ती बोरगुडे ,श्री.भाऊसाहेब घुमरे,सौ अलकाताई घुमरे, लक्ष्मण पाटील बोरगुडे,मंजू जाधव,आविष्कार कोटकर, आनंदा डावखर,सोहम कोटकर, आणि गावातील ग्रामस्थ व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.सदर दिंडी सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शालेय शिक्षक वृंद शेख सर, गारे सर, शिंदे सर, ठोंबरे सर,रोकडे सर, रोहिणी पाटील मॅडम ,इकडे मामा ,तांबोळी मामा यांनी परिश्रम घेतले.






