Home अमरावती अमरावती जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्र दुर्गापुर येथे महाराष्ट्र कृषी दिन उत्साहात साजरा

अमरावती जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्र दुर्गापुर येथे महाराष्ट्र कृषी दिन उत्साहात साजरा

65

आशाताई बच्छाव

1001661698.jpg

अमरावती जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्र दुर्गापुर येथे महाराष्ट्र कृषी दिन उत्साहात साजरा दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. जिल्हाप्रतिनिधी.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून तसेच महाराष्ट्रातील शेतकरी तांत्रिकदृष्ट्या प्रगत होऊन शेती कुशल बनावा जेणेकरून खऱ्या अर्थाने शेतकरी समृद्ध होईल या निर्धाराने कृषी विज्ञान केंद्र दुर्गापुर येथे कृषी दिन साजरा करण्यात आला, तसेच जिल्ह्यात कृषी तांत्रिक सप्ताह आयोजनाची सुरुवात येथून करण्यात आली.

या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. के पी सिंह हे लाभले. मंचावर उपस्थित मान्यवर म्हणून कृषी विस्तारतज्ञ पी. एस जायले, कृषीविद्या तज्ञ डॉ. एच व्ही ठाकूर, पशुसंवर्धन तज्ञ महेश आखुड व कार्यालयीन अधीक्षक संतोष देशमुख उपस्थित होते.

कार्यक्रमास संबोधित करताना डॉ. सिंह म्हणाले की, महाराष्ट्रात कृषी विकसास चालना देणारे महान व्यक्तीमत्व म्हणून डॉ.वसंतराव नाईक यांना जाणले जाते. त्यांच्याच संकल्पनेतील कृषी विकास घडावा या हेतूने कृषी विज्ञान केंद्र हे जिल्हाभरात शेतकऱ्यांच्या सेवेत सदैव तत्पर असते. शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन वाढवण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले, जैविक निविष्ठा वापर, हवामान अनुकूल शेती, सेंद्रिय शेती, पाण्याचे योग्य व्यवस्थापन या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. पुढे बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, कृषी विज्ञान केंद्र दुर्गापुर मार्फत उपलब्ध असलेल्या सर्व सोयीसुविधांचा लाभ घ्यावा तसेच आगामी कृषी तांत्रिक सप्ताहामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा.

कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर येथील कार्यालयीन अधीक्षक संतोष देशमुख यांनी माहिती देताना डॉ. वसंतराव नाईक यांच्या शेतकरी, लोकशाही आणि राष्ट्र समर्पित जीवनाचा आलेख समुचित पणे मांडला. त्यांच्या महान विचारांचा वारसा अंगीभूत करून व जीवनात आचरण करून महाराष्ट्रातील शेतकरी नक्कीच कृषी क्षेत्रात अग्रेसर राहील व याच ध्येयपूर्तीसाठी कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापुर अतुलनीय कामगिरी बजावेल अशी आशा व्यक्त केली.

महेश आखुड यांनी माहिती देताना सांगितले की, आगामी ठरवलेल्या दि. 1 ते 7 जुलै दरम्यान जिल्हाभरात कृषी तांत्रिक सप्ताहाचे आयोजन, कार्यक्रम रूपरेषा, शेतकरी सेवेसाठी करावयाची कामे याविषयी उद्बोधन केले.

कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी राहुल जगताप यांनी तर आभार प्रदर्शन महेश आखुड यांनी पार पाडले.

या कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूर येथून विषय विशेषज्ञ प्रफुल्ल महल्ले, डॉ. हर्षद ठाकूर, आरती येवतीकर, राहुल घोगरे, आकाश धरमकर, सुरेश वैद्य, अश्विनी पोतदार, प्रणाली देशमुख, सचिन पिंजरकर, ऋषिकेश शिंदे, महेंद सेंगर, विशाल राऊत, उमेश तायडे, आशिष रंगारी, सोनाली कालभूत, विशाखा रानोटकर, ऋषीराज शेखावत यासह स्थानिक शेतकरी, महिला व युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.