Home नांदेड लक्ष्मीकांत कद्रेकर यांचा सेवापूर्ती सोहळा कार्यक्रम संपन्न.

लक्ष्मीकांत कद्रेकर यांचा सेवापूर्ती सोहळा कार्यक्रम संपन्न.

171

आशाताई बच्छाव

1001661492.jpg

लक्ष्मीकांत कद्रेकर यांचा सेवापूर्ती सोहळा कार्यक्रम संपन्न.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

शासनाच्या सेवा क्षेत्रात माणुसकीचे व्रत जपणारे लक्ष्मीकांत कद्रेकर यांचा सेवानिवृत्ती समारंभ ०२ जुलै रोजी तहसील कार्यालय देगलूर येथे संपन्न झाला. २५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते पेशकार पदावरून निवृत्त झाले. त्यांच्या सेवा कार्याची आणि जनसामान्यांसाठी असलेल्या त्यांच्या आत्मीयतेची उपस्थितांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.
कार्यक्रमाला तहसीलदार भरत सूर्यवंशी, नायब तहसीलदार गिरीश सर्कलवाड, नायब तहसीलदार गंदी गुडे मॅडम, नायब तहसीलदार पदमवार साहेब यांच्यासह प्रशासनातील अनेक अधिकारी, कर्मचारी व कद्रेकर यांचा परिवार उपस्थित होता.
कद्रेकर यांनी आपल्या सेवाकाळात हदगाव, नांदेड व देगलूर उपविभागीय कार्यालयात काम करताना शेकडो नागरिकांची कामे प्रामाणिकपणे केली. त्यांच्या समजूतदार व मृदू स्वभावामुळे ते ‘मामा’ नावानेच ओळखले जात होते.
निरोप समारंभात तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी कद्रेकर यांच्या सेवेचं विशेष कौतुक करताना सांगितलं की, “ते केवळ कर्मचारी नव्हते, तर गरिबांचा आधार होते.”
आपल्या मनोगतात कद्रेकर यांनी सर्व सहकाऱ्यांचे व वरिष्ठांचे आभार मानले. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला…

Previous articleडॉक्टर डे निमित्त देगलूर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने सन्मान.
Next articleव्यवसाय अपडेटसाठी २० जुलैला छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यापार परिषद
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.