आशाताई बच्छाव
उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे डॉक्टर्स डे निमित्य डॉक्टरांचा सत्कार.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
देगलूर – दिनांक 1 जुलै मंगळवार रोजी उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे डॉक्टर्स डे च्या निमित्ताने रुग्णसेवा मंडळ औरंगाबाद शाखा देगलूर च्या वतीने वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेश देवणीकर सर व रुग्णालयात सेवा देत असलेल्या वैद्यकीय अधिकारी:
डॉ . अनिल थडके,
डॉ. विश्वनाथ मलशेटवार,
डॉ. रवी काळे,
डॉ. महेश पेटकर,
डॉ. राजेश साखरे,
डॉ. चंद्रकांत पाटील,
डॉ. शेख मुजीब,
डॉ. संजय इंगळे,
डॉ. गोदावरी सावळे,
डॉ. फरहीन फारुकी,
डॉ मोना ओहोळ इ. डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला
याप्रसंगी देगलूर रुग्णसेवा मंडळ शाखेचे प्रमुख
श्री मारोतराव पुलचुवाड,
रुग्ण मित्र श्री दोडे,
श्री कळसकर गंगाकुमार,
श्री एस. जी. वासरे,
श्री पी. एच. कुलकर्णी व श्री रामचंद्र दोन्तुंलवाड, यांचे सह रुग्णालयातील अनेक कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.
प्रस्ताविक श्री रामचंद्र दोन्तुंलवाड सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री पी. एच. कुलकर्णी यांनी केले उपजिल्हा रुग्णालय देगलूर तर्फे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेश देवणीकर सर सत्काराला उत्तर देताना म्हणाले की अशा या कार्यक्रमामुळे आमचे व रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे मनोबल वाढते, उपजिल्हा रुग्णालय हे रुग्णांना तत्पर सेवा देण्याचा सदैव प्रयत्न करीत राहील.