आशाताई बच्छाव
रेशनिंगचे धान्य वेळेत व ऑनलाईन मिळत नसल्याचा आरोप
अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे
अहिल्यानगर तालुक्यातील रांजणी येथे रेशनिंगचे धान्य वेळेत व ऑनलाईन पध्दतीने मिळत नसल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ग्रामस्थांसह शिष्टमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रेशन दुकानदारावर कारवाई करुन ग्रामस्थांना वेळेत ऑनलाईन पध्दतीने धान्य उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे, तालुका अध्यक्ष रविकिरण जाधव, जे. डी. शिरसाठ, सुधीर ठोंबे, राजीव भिंगारदिवे, आतिफ शेख, अशोक लिपाने, संतोष उन्हाळे, काशिनाथ जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. रांजणी गावात रेशन धान्य दुकानदाराला दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धान्य प्राप्त होत आहे. मात्र, दुकानदार शेवटच्या दोन दिवसात धान्याचे वितरण करतो. गावात इंटरनेटची रेंज असून, देखील ऑफलाइन पद्धतीने धान्याचे वितरण केले जात, असल्याचा आरोप केला आहे.