Home रायगड रायगड जिल्ह्यात लाखो रुपयांचा गुटखा जप्त

रायगड जिल्ह्यात लाखो रुपयांचा गुटखा जप्त

180

आशाताई बच्छाव

1001651183.jpg

युवा मराठा न्यूज रायगड ब्युरो चीफ :- मुजाहीद मोमीन

ताकई – महड रस्त्यावरील खासगी जागेत अवैध गुटखा साठा असल्याची माहिती रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर स्टिंग ऑपरेशन करीत अंदाजे लाख रूपयांचा गुटखा साठा पकडून दिला आहे.

अवैध गुटखा साठा ताकई – महड रस्त्यावरील खासगी जागेतील रूम आणि कंटेनरमध्ये करीत असल्याची गुप्त माहिती मिळली होती. रिपब्लिकन सेनेने रात्री दिड वाजण्याच्या सुमारास स्टिंग ऑपरेशन करीत घटनास्थळी पोहचले.

यावेळी गुटखाने भरलेला टेम्पो चालक फरार झाला त्यानंतर रात्रभर घटनास्थळी थांबून राहिले होते. सकाळी अन्न

सुरक्षा अधिकारी पेण विक्रम निकम यांच्यासह १३ अधिकारी, कर्मचाऱ्यांची टिम, खोपोली पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरिक्षक अभिजीत व्हांयबराळे आणि पोलीस टिमने कारवाई करीत दोन खोल्या आणि कंटेनरचे कुलूप उघडले असता अंदाजे लाख रूपयाच्या आसपास मुद्देमाल आणि मालाची वाहतूक करण्यासाठी वापरली जाणारी स्कुटी एमएच-४६ सी, एफ ८८५२ जप्त केली आहे.

गुटखा विक्री करणारे आरोपी फरार असून यांच्या विरोधात खोपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी पेण विक्रम निकम यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Previous articleराहुरी येथे ₹ 70लाख 73 हजार 920 रुपये किमतीच्या बनावट चलनी नोटा जप्त …
Next articleमुलांनी शालेय शिक्षणाबरोबर अतिरिक्त ज्ञान आत्मसात करणे गरजेचे—सौ स्मिताताई कुलकर्णी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.