आशाताई बच्छाव
शिंदखेडा येथे आमदार बबनराव लोणीकरांच्या फोटोवर जोडे मारून आंदोलन
शानाभाऊ सोनवणे : शेतकऱ्यांवरील वक्तव्याचा निषेध
(शिंदखेडा प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)
शिंदखेडा :। भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना विविध योजनांद्वारे पोसत आहोत, असे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिंदखेडा तालुक्यात आक्रमक झाली. काल शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता शिंदखेडा येथे आमदार लोणीकर यांच्या फोटोंवर जोडे-चप्पल मारून निषेध व्यक्त करण्यात आला.
या वेळी बोलताना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी स्पष्ट केले, की भाजप सरकार ज्या योजना राबवत आहे, त्यासाठी लागणारा निधी हा सर्वसामान्य जनतेकडून,
विशेषतः शेतकऱ्यांकडून गोळा केलेल्या जीएसटीमधूनच येतो. किराणा मालासह इतर सर्व खरेदीवर १८ टक्के जीएसटी आकारला जातो. जर शेतमालाला हमीभाव दिला असता, तर आमचा शेतकरीच सरकारला पोसला असता. भाजप नेत्यांचे वर्तन व विधाने ही शेतकऱ्यांचा अपमान करणारी आहेत. यावेळी सर्जेराव पाटील यांनीही भावना व्यक्त करताना सांगितले, की शेतकरी व ग्रामीण महिलांबाबत अशी विधाने अत्यंत दुखावणारी आहे. लोणीकर यांनी याबाबत खुली माफी मागावी. शेतकरी प्रतिनिधी रावसाहेब ईशी म्हणाले, शेतमालाला जर योग्य हमीभाव दिला गेला, तर शेतकऱ्यांना कोणत्याही सरकारी
योजनेचा आधार घ्यायची गरज भासणार नाही. लोणीकर यांनी तातडीने माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. यावेळी आंदोलनकर्त्यांनी ‘करायचं काय खाली डोकं, वरती पाय’, ‘राजीनामा द्या’, ‘बबन लोणीकर हाय हाय’ अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला. आंदोलनात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, सर्जेराव पाटील, छोटू पाटील, गिरीश देसले, कल्याण बागल, नंदू पाटील, रावसाहेब ईशी, मुकेश कोळी, विष्णू चव्हाण, गायतम कोळी, भाईदास पाटील, शैलेश सोनार, योगेश ईशी, ईश्वर पाटील, संतोष देसले, सागर देसले, एस. डी. अण्णा आदी कार्यकर्ते उपस्थित होते.