आशाताई बच्छाव
मुंबई–आग्रा महामार्गावर बॉम्बे इंदोर ट्रॅव्हल्स ला अचानक आग
(ट्रॅव्हल्स संपूर्ण जळून खाक तर प्रवासी बाल बाल बचावलए)
(विरदेल प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील)
धुळे –मुंबई-आग्रा महामार्गावर देवभाने गावाजवळ ट्रॅव्हल्सला भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. या ट्रॅव्हल्समध्ये सुमारे ३५ ते ३६ प्रवासी होते. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉल्फीन ट्रॅव्हल्स (एमपी ०९/बीजे ५५४४) ही ट्रॅव्हल्स मुंबईकडून इंदुरकडे जात होती. आज सकाळी ६ वाजून ३५ मिनीटांनी सदर ट्रॅव्हल्स मुंबई-आग्रा महामार्गावरील देवभाने-कापडणे फाट्याजवळून जात असताना ट्रॅव्हल्सला अचानक आग लागली. ही बाब चालक जावेद खान यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने तातडीने रस्त्याच्या बाजुला ट्रॅव्हल्स थांबवली. त्यानंतर सर्व प्रवाशांना सुखरुप उतरविण्यात आले. पाहता पाहता आगीने संपूर्ण ट्रॅव्हल्सला कवेत घेतले. आगीची माहिती लागलीच धुळे कंट्रोल रुमला प्राप्त आली. त्यानंतर महापालिकेच्या अग्निशामक बंबांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी अग्निशमन अधिकारी दुष्यंत महाजन, वाहन चालक राहुल पाटील, विनोद थोरात, लिडिंग फायरमन अतुल पाटील, फायरमन पांडूरंग पाटील, श्याम कानडे, कुणाल ठाकूर यांनी दोन बंबांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, आगीत ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. सदर ट्रॅव्हल्स ही मुंबई येथील नौशाद सिद्दीकी असे या ट्रॅव्हल्स मालकाचे नाव आहे