Home नाशिक संजय देशमुख यांना मानाचा व सन्मानाचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर

संजय देशमुख यांना मानाचा व सन्मानाचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर

118

आशाताई बच्छाव

1001638394.jpg

संजय देशमुख यांना मानाचा व सन्मानाचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर

नाशिक नगरीत २९ रोजी भव्य दिव्य पुरस्काराचे वितरण

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

साई धनवर्षा फाउंडेशन नाशिकचे संस्थापक अध्यक्ष संजय विजय देशमुख यांना मनू मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व महावीर इंटरनॅशनल नासिक यांच्या वतीने सामाजिक कार्यातील उल्लेखनीय कामगिरीची बाजू लक्षात घेता मानाचा व सन्मानाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे अशी माहिती मनू मानसी सेवाभावी संस्थेच्या मेघाताई शिंपी व महावीर इंटरनॅशनल नाशिक डॉ अनिल नहार व संस्थेच्या कार्याध्यक्ष मंजू जाखाडी यांनी दिली आहे.
सामाजिक कार्यकर्ते संजय देशमुख यांनी कोरोना महामारीच्या काळात शेकडो रुग्णांना कोरोना सेंटर मध्ये जाऊन जेवणाची मदत करणे तसेच ऑक्सिजन तसेच औषधी इतर पुरवठा करणे, तसेच आरोग्य चाचणी व रक्तदान शिबिर राबवून रुग्णांसाठी रक्तपुरवठा करणे, तसेच अनाथ आश्रमातील मुला मुलींना शालेय उपयोगी वस्तू देणे, तसेच वृद्धाश्रमात वृद्धांना मदत करणे आदिवासी पाड्यांवर जाऊन गरजू लोकांसमवेत दिवाळी साजरी करणे व त्यांना अन्नधान्याची मदत करणे, महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांना एकत्र करून त्यांना विनामुल्य पुरस्कार देऊन सन्मानित करणे, तसेच शेकडो बहिणींच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या अडचणी दूर करून मदत करणे, नाशिक जिल्ह्यातील हजारो बेरोजगार तरुणांना मार्गदर्शन करून रोजगार उपलब्ध करून देणे, तसेच मराठा समाजाच्या आंदोलनावेळी लढणारा धाडसी योद्धा, म्हणून ओळख निर्माण करणारे, शेकडो पुरस्काराने पुरस्कृत नाशिक जिल्ह्यातील समाजसेवक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला आहे.
नाशिक नगरीमध्ये पन्नास वर्षे पूर्ण झालेल्या बंधूंना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे मनू मानसी सेवाभावी संस्था व महावीर इंटरनॅशनल नाशिक यांच्या वतीने शिक्षण ,समाज प्रबोधन, अध्यात्मिक, पत्रकारिता, कृषी ,औद्योगिक आदी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बंधूंना सन्मानित करण्यात येणार असून दिनांक २९/६/२०२५ रोजी के के वाघ कॉलेज नाशिक समोर जोशी नर्सरी च्या बाजूला ठीक दुपारी २:०० वाजे ला होणार आहे अशी माहिती मनु मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्ष मेघाताई शिंपी व डॉ अनिल नहार सर व कार्याध्यक्ष मंजु जाखाडी यांनी दिली आहे.

Previous articleमालेगाव तहसिल कार्यालयात 2 जुलै रोजी जप्त केलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव
Next articleमुंबई–आग्रा महामार्गावर बॉम्बे इंदोर ट्रॅव्हल्स ला अचानक आग
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.