आशाताई बच्छाव
मालेगाव तहसिल कार्यालयात 2 जुलै रोजी जप्त केलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव
मालेगाव – आंशुराज राऊत पाटील
मालेगाव तालुक्यात वाळू चोरी विरोधी पथकांनी अवैधरित्या गौण खनिजांचे वाहतुक करताना जप्त केलेल्या वाहन मालकांविरुध्द दंडात्मक कार्यवाही केली आहे. वाहनांच्या मालकांनी दंडात्मक कार्यवाहीतील आदेशातील रक्कम शासन जमा केली नसल्याने सदरील वाहने जंगम मालमत्ता अटकावून ठेवण्यात आलेली आहेत. त्या अनुषंगाने वाहनांचा जाहीर लिलाद्वारे विक्री करुन दंडात्मक कार्यवाहीतील रक्कम वसुल करण्यासाठी 2 जुलै रोजी सकाळी 11 वाजता मालेगाव तहसिल कार्यालय येथे जाहीर लिलाव करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसिलदार विशाल सोनवणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
अवैधरित्या गौण खनिजांचे वाहतुक करताना जप्त केलेल्या जंगम मालमत्ताधारकांचे नाव रामभाऊ दिलीप पवार, ट्रॅक्टर क्रमांक MH 41 D 5048 लिलावाची रक्कम 1,50,000/-, दत्तू जाधव, रा.सावतावाडी, ट्रॅक्टर क्रमांक – MH 41 T 1666 लिलावाची रक्कम 1,50,000/- याप्रमाणे वाहनांचा जाहिर लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावात भाग घेणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी लिलावात भाग घेण्याचा अर्ज, लिलाव होणाऱ्या जंगम मालमत्ताची हातची किंमत, अनामत रक्कम तसेच लिलावाच्या अटी व शर्तीकरिता तहसिल कार्यालय, मालेगाव येथे अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा व लिलावात जास्तीत जास्त लोकांनी, संस्थानी भाग घ्यावा, असे आवाहन तहसिलदार श्री. सोनवणे यांनी केलेआहे.