आशाताई बच्छाव
पिंटू मगदूम फार्मसीचे वार्षिक निकालामध्ये घवघवीत यश
कोल्हापूर अविनाश शेलार ब्युरो चीफ –डॉ.जे. जे. मगदुम ट्रस्ट संचलित, धरणगुत्ती येथील पिंटू मगदूम मेमोरियल फार्मसी कॉलेजने
औषध निर्माण शास्त्र पदविका (डी.फार्मसी)
अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परीक्षामध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.
द्वितीय वर्षाचा निकाल ९५% तर प्रथम वर्षाचा निकाल ८५ % लागला. द्वितीय वर्षाच्या कु. मेहक समीर नदाफ ८०. १८% गुण प्रथम क्रमांक,कु. सायली अरुण शिंदे ७६. ६४ % गुण द्वितीय क्रमांक व कु. नदाफपिंजारी साजिदा मंजिल ७५. ८२%तृतीय क्रमांक पटकावून सुयश संपादन केले. प्रथम वर्षामध्ये कु. तनिष्क परशुराम कोळेकर ७७.४०% प्रथम, कु. तृप्ती चंद्रकांत माने ७६.६०% द्वितीय व
कु.शुभांगी सुनील शिकलगार ७५. १०% तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे.
महाविद्यालयाने आपल्या शैक्षणिक गुणवत्ते सोबतच आय.एस.ओ. मानांकण व कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव एन. बी.ए. ॲक्रेडिशन डी. फार्मसी कॉलेज होण्याचा बहुमान मिळवला आहे.
ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हाईस चेअरपर्सन डॉ. सोनाली मगदूम, प्राचार्य डॉ. सचिन निटवे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व व इतर कर्मचारी यांचे विद्यार्थ्यांना सहकार्य लाभले.