Home उतर महाराष्ट्र सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात यांच्या प्रेरणेतून जयहिंद लोकचळवळ ने संगमनेर तालुक्यात दंडकारण्य...

सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात यांच्या प्रेरणेतून जयहिंद लोकचळवळ ने संगमनेर तालुक्यात दंडकारण्य अभियान ही चळवळ सुरू केली

129

आशाताई बच्छाव

1001638240.jpg

श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी- सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात यांच्या प्रेरणेतून जयहिंद लोकचळवळ ने संगमनेर तालुक्यात दंडकारण्य अभियान ही चळवळ सुरू केली. आजपर्यंत कोट्यावधी वृक्षांची लागवड करण्यात आली. आता ही चळवळ राज्यभर विस्तारत आहे. याच प्रेरणेतून आज नाशिकमध्ये श्री.भरत आंधळे, अति.आयकर आयुक्त, नाशिक यांनी पुढाकार घेत हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र 21000 वृक्षारोपण करण्याचा निर्धार केला. यावेळी जयहिंद लोकचळवळ ने या उपक्रमास मार्गदर्शन केले. सिन्नर तालुक्यातील ठाणगांव, बेलटेकडी डोंगरावर 21000 झाडांचे वृक्षारोपन करण्यात आले. मालपाणी ग्रुप संगमनेर यांच्या वतीने या उपक्रमास अर्थसहाय्य करण्यात आले. यावेळी डॉ. प्रवीण गेडाम (विभागीय आयुक्त नाशिक), श्री. जी. मल्लिकार्जुनजी (मुख्य वन संरक्षक नाशिक), श्री. गजेंद्र हिरे (उप वनसंरक्षक वन्यजीव, नाशिक), श्री. उमेशजी वावरे (उप वनसंरक्षक, नाशिक पूर्व), श्री. सिध्देशजी सावर्डेकर (उप वन संरक्षक, नाशिक पश्चिम) हे उपस्थित होते. जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुधीर तांबे यांनी सुरू केलेलं दंडकारण्य अभियान आता संगमनेरसह नाशिक जिल्ह्यातही विविध ठिकाणी कार्यरत आहे. यातील एक महत्वाचा भाग म्हणजे वणी येथील सप्तसृंग गडावर सुरू असलेले 100 एकरवर देखील मोठ्या प्रमाणात वृक्षलागवडीचे काम सुरू आहे.