आशाताई बच्छाव
कौळाणेतील रमेश गवळी यांचे हृदयविकाराने निधन
मालेगाव:- कौळाणे (नि) ता.मालेगाव येथील भुमिपुत्र व एक हुरहुन्नरी कलावंत रमेश यशवंत गवळी यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने काल निधन झाले.
रमेश यशवंत गवळी हे एक परिसरात हुरहुन्नरी कलावंत म्हणून प्रसिद्ध होते.लग्नकार्यात संबळ वाजविण्यात त्यांचा मोठा हातखंडा होता.गायनाची विशेषतः पोवाडे म्हणण्याची त्यांना विशेष आवड होती.”हुंड्याच्या गळफास”या सत्यघटनेवरील नाटकात त्यांची पीएसआय वाघमारे ही भुमिका विशेषतः खुपचं गाजली होती.सगळयांच्या सुख दुःखात धावून जाणारे व सदा हसतमुख असणारे रमेश गवळी यांच्या अकाली जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे.व कौळाणेतील एक हुरहुन्नरी कलावंत आज हरपला असल्याची उणीव प्रत्येकाला निश्चितच जाणवेल.गवळी परिवारावर कोसळलेल्या आकस्मित दुःखात युवा मराठा न्यूज नेटवर्क महाराष्ट्र परिवार सहभागी असून परमेश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना व भावपूर्ण श्रद्धांजली