आशाताई बच्छाव
धर्माचार्य हभप निवृत्ती महाराज रायते यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर
अध्यात्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची घेतली दखल
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे
अखंड महाराष्ट्रभर किर्तन, प्रवचन, कथा, सत्संग आधी धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करताना समाज प्रबोधन करून अध्यात्माची गोडी लागावी या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्नशील असलेले सुप्रसिद्ध कीर्तनकार तसेच अखिल भारतीय वारकरी मंडळाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष धर्माचार्य हभप निवृत्ती महाराज रायते खडक माळेगावकर यांना अध्यात्मिक व समाजप्रबोधनातील उल्लेखनीय कार्याबद्दल मनू मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व महावीर इंटरनॅशनल नासिक यांच्यावतीने जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला असून नाशिक येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती मनू मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका सौ मेघाताई शिंपी, महावीर इंटरनॅशनल चे नासिक अध्यक्ष अनिल नहार साहेब व कार्याध्यक्ष मंजू जाखाडी यांनी दिली आहे.
नाशिक नगरीत पन्नास वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मान्यवर व्यक्तींचा मनु मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व महावीर इंटरनॅशनल नासिक यांच्या वतीने शिक्षण, समाज प्रबोधन, अध्यात्म, पत्रकारिता कृषी, औद्योगिक आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा जीवनगौरव पुरस्कार देऊन यथोचित सन्मानाने गौरविण्यात येणार आहे.महावीर इंटरनॅशनल नाशिक व मनू मानसी महिला सेवाभावी संस्थेच्या वतीने समाजात विविध घटकात काम करणाऱ्यांच्या वयाच्या पन्नास वर्षे पुढील व्यक्तींचा जीवन गौरव पुरस्काराने सहकुटुंब परिवार सन्मान सोहळा आयोजन करण्यात आले असून या पुरस्काराचे स्वरूप उत्कृष्ट सन्मानचिन्ह ,प्रशस्तीपत्र व फेटा असुन हा जीवन गौरव पुरस्कार वितरण सन्मान सोहळा २९ जुन रविवार दुपारी २ वाजता के के वाघ कॉलेजच्या समोर, जोशी नर्सरी शेजारी ,मुंबई- आग्रा हायवे सर्विस रोड नाशिक ३ येथे आयोजित करण्यात आला असून सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात आले आहे.






