आशाताई बच्छाव
विरदेल येथे देवकर विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.
(विरदेल प्रतिनिधी–राकेश बेहेरे पाटिल)
शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील श्रीमंत गोविंदराव संपतराव देवकर माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन योग गुरु श्री.प्रवीण महाजन, त्यांचे सहकारी श्री पाटोळे सर व धमाने आरोग्य केंद्राचे डॉक्टर श्री. विकास राऊत व आरोग्य विभागातील सर्व आशा भगिनी यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रात्यक्षिकाने उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.जे.एस.पाटील,पर्यवेक्षक श्री. एस.एस.गोसावी,विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी व विद्यार्थी यांनी योग प्रात्यक्षिक करून लाभ घेतला. त्यानंतर विद्यालयाच्या भव्य प्रांगणात एक पेड मां के नाम उपक्रम अंतर्गत इयत्ता सहावी ब चा विद्यार्थी कृष्णा निलेश ईशी व माता पालक सौ.जयश्री निलेश ईशी तसेच इयत्ता आठवी ब चा विद्यार्थी प्रथमेश गुणवंत शिंदे व माता पालक सौ.प्रियंका गुणवंत शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.