आशाताई बच्छाव
शहरातील प्रभागातील रस्ता नालीकामांना निधीची कमतरता भासू देणार नाही ; माजी मंत्री संजय बनसोडे
ठेकेदारांनी कामाची गुणवत्ता दर्जेदार करावी
भगीरथ राजा नगर प्रभागातील कामाचे उद्घाटन
उदगीर लातुर / प्रतिनिधी बाळासाहेब शिंदे
उदगीर शहराच्या लगत असलेल्या प्रभाग क्रमांक चार मधील भगीरथ राजा नगर ते कमलेश्वर प्राथमिक व माध्यमिक शाळेपर्यंत तसेच आजाद नगर, शिवनगर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, कादरी फंक्शन हॉल, अलॶमिन नगर, अल्पसंख्याक प्रभागातील दलित वस्तीसह इतर प्रभाग क्रमांक चार अंतर्गत येणाऱ्या गल्लीबोळातील नाली बांधकाम व कच्चा व पक्का रस्ता सह सिमेंट व कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा नियोजन समितीचे शासन नियुक्त अशासकीय सदस्य प्रा.डॉ. श्याम भाऊ डावळे यांच्या हस्ते आज दि. २५ जून रोजी सकाळी दहा वाजता शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी उदगीरचे कार्यसम्राट विकासपुरुष माजी कॅबिनेट मंत्री संजय भाऊ बनसोडे यांनी या प्रभागातील, गल्लीबोळातील कच्चे रस्ते व पक्के रस्ते सह नाली व सिमेंट काँक्रीट कॉंक्रिटीकरण करण्याकरिता सव्वा कोटी रुपयाचे अंदाजपत्रकीय कामे मंजूर केले आहेत. या भगीरथ राजा नगर, आझाद नगर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलनी, अल्पसंख्याक कॉलनी, असल्याकारणाने भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षानंतरही हा भाग अविकसित होता. या भागामध्ये साधे चालताही येत नव्हते. गुडघ्या पर्यंत चिखलायुक्त रस्ते या भागात होते. या भागाला माजी कॅबिनेट मंत्री कार्यसम्राट विकासपुरुष आमदार संजय बनसोडे यांनी दत्तक घेऊन विकास कामाचा सपाटा सुरू केला असून त्या कामाचा शुभारंभ आज दि.२५ जून रोजी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा नियोजन समितीचे शासन नियुक्त अशासकीय सदस्य प्राध्यापक डॉक्टर श्याम भाऊ डावळे यांच्या हस्ते करण्यात आले.
सदरील प्रभाग क्रमांक चार मधील अविकसित प्रभागातील अनेक वर्षांपासून गल्ली, बोळातील वीस ते तीस फूट रस्त्यावरून साधे चालताही येत नव्हते आणि जळकोट रोड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५९ लगत पुर्व बाजू भगीरथ राजा नगरपासून ते कमलेश्वर कन्या प्राथमिक व माध्यमिक शाळेपर्यंत प्रभागातील रहिवासी, जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, रुग्ण यांना ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होते. याबाबतीत प्रभागाचे कार्यतत्पर, कर्तव्यनिष्ठ नगरसेवक म्हणून नावलौकिक असलेले या प्रभागाचे नगरसेवक अनिल भाऊ मुदाळे यांनी हा प्रश्न माजी कॅबिनेट मंत्री आमदार संजय बनसोडे साहेब यांच्याकडे सतत पाठपुरावा करून या कामांना मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून घेतला. हे विशेष आहे. त्याबद्दलही नगरसेवक अनिल भाऊ मुदाळे त्यांचे व नगरसेवक राजकुमार भालेराव यांचेही प्रभागातील नागरिक समाधान व्यक्त करून आभार व्यक्त केले आहेत. या भागाला महाराष्ट्र राज्याचे माजी युवक कल्याण व क्रीडा मंत्री तथा उदगीर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार संजयजी बनसोडे साहेब यांनी मंजुर केलेला प्रभाग क्रं ४ मधील राजा भगिरथी नगर येथील सिमेंट काँक्रिट रोड व नाली बांधकाम या विकास कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रा.डॉ. श्यामभाऊ डावळे, राष्ट्रवादी पार्टीचे उदगीर शहराध्यक्ष सय्यद जानीभाई, माजी नगरसेवक राजकुमार भालेराव, अनिल मुदाळे, फैयाज शेख यांच्या हस्ते संपन्न झाले . या वेळी राजकुमार चव्हाण, व्यंकट बोईनवाड, नाना इब्राहिम पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत औटे, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष शफी हाशमी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप जोंधळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते संघशक्ती बलांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्ही.जी.एन.टी.विभागाचे उदगीर शहराध्यक्ष बापू सोळुंके, बाळू सगर, हिफ्जुरहेमान हाशमी, सरपंच शुभम केंद्रे, सरपंच कुंडगीर, पत्रकार संजय शिंदे, जेष्ठ नेते वामनराव धोंड, सेवानिवृत्त पोलिस ठाणे अंमलदार श्यामसुंदर चोले, माजी सैनिक श्याम गायकवाड, मनोहर सकनुरे, बाबूराव केंद्रे सर, नागनाथ केंद्रे, देवानंद बेळसिंगे, रविकांत धोंड, व्यंकटराव पानचावरे, सौ.राठोडताई, अभय केंद्रे, कपिल सोनटक्के यांच्या सह या प्रभागातील व नगरातील अनेक नागरीक उपस्थित होते.