आशाताई बच्छाव
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात वरूण राजाचा दुष्काळ!१२९ गावांची तहान टँकरवर. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती( मेळघाट). गत मे महिन्यात अवकाळी पावसाने जिल्ह्यात अहंकार निर्माण केला होता त्यानंतर आता निम्म जून महिना ही संपत आला आहे असे असताना वरून राजा मात्र अद्यापही बसला नाही परिणामी अमरावती जिल्ह्यातील मेळघाटसह गैर आदिवासी भागातील १0 हजारावर नागरिकांना २0 टँकर व १२७ विहिरी आणि बोरवेल अधिग्रहण द्वारे पाणीपुरवठा करून १२९ गावाची तहान भागविली जात आहे पावसाळा सुरू झाला आहे मात्र अद्याप जोरदार पावसाने हजेरी लावली नाही परिणामी ग्रामीण भागात टँकर आणि विहीर अधिग्रहणाची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा मंजूर केला आहे यामध्ये जून महिन्यापर्यंत त्याचे नियोजन केले आहे मात्र दरवर्षी जून महिन्यात पावसाला सुरुवात होते पाणीटंचाई निवारण चे काम वरून राजा करतो यंदा जिल्ह्यात उन्हाचा तळा काही चांगलाच वाढला आहे अद्याप पर्यंत जोरदार पावसाने हजेरी लावली नाही अशा ठिकाणी पिण्याच्या पाण्याची स्थिती बिकट झाली आहे पाऊस लवकर पडला तर टँकर बोरवेल आणि विहिरी अधिकरण पाणीपुरवठ्यातून नागरिकांची ही सुटका होणार आहे पाऊस पडत असला तरी कुठे पडतो तर कुठे काहीच नाही त्यामुळे पाणी टंचाईची स्थिती जोरदार पाऊस पडेपर्यंत सुधारणार नाही अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील आकी, खडीमल, मोठा लवादा, शहापूर,तारा बंद गौलखेडा बाजार मेरी, बादरपुर धरण डोहा गवळीढाणा,आला डोहा हिरा पाणी, आधी 10 गावात२0 टँकरने नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे ४3 बोरवेल,८४ विहिरीचे अधिग्रहण असून पाणीटंचाई निवारणार्थ प्रश्न सोडवण्यासाठी १0९ गावात विहिरी ४३ बोरवेल आणि ८४ खाजगी विहीर अधिकृत करण्यात आले आहे या ठिकाणी होऊन वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे यामधून पाणीटंचाई समस्या निवारण केले जात आहे पाणीटंचाई आखाड्यातील नियोजनुसार या गावात सध्या हे पाणी टंचाईची समस्या आहे अशा १0 गावात टॅंकरने तर १0९ गावात विहीर व बोरवेल अधिकृत करून पाणीपुरवठा केला जात आहे असे सुनील जाधव कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग यांनी आमच्या प्रतिनिधींना माहिती दिली.