आशाताई बच्छाव
जाता पंढरीशी सुख वाटे जीवा
कसबे सुकेणे ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा वाटेवर चालतांना
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे
पायी दिंडीचा आज आठवा दिवस आहे आजचा मुक्काम नगर येथे आहे मी मागच्या अंकात सांगितल्याप्रमाणे दिंडी ह.भ.प.अशोक महाराज खापरे हे काढतात हे महत्त्वाचे आहेच पण दिंडीमध्ये गायनाचार्य मृदुंगाचार्य पाहिजे त्याच्याशिवाय दिंडी पुर्ण होत नाही. ह्या दिंडीमध्ये गायनाचार्यांचे नाव पुढील प्रमाणे आहे पहिले गायनाचार्य म्हणजे ह भ प अशोक दास महाराज ,भास्कर कारभारी सोनवणे, पुंडलिक महाराज वाघ ,आप्पा लोखंडे ,रावसाहेब सावंत, काही महिला पण गायक आहेत. गीताबाई फुगट, कमलताई मोरे, जनाबाई हिरे ,निर्मला ढेपले, सुरेखाताई हेमले ,सुनिता भंडारे तसेच यात्रेकरूंचे सामान नेण्यासाठी ट्रक व पिकअप केलेले असतात . ट्रक मालक अंबादास लभडे व पाण्याचा टॅक्टर सुदाम मत्सागर, विजय मत्सागर व हेमंत खालकर , अनिल भंडारे यांच्या अनमोल सहकाऱ्यांनी मदत होते यातले जे भास्कर कारभारी सोनवणे हे गायनाचार्य अतिशय सुसंस्कृत व सातवी पद्धतीचे भजन म्हणतात .टाळ पण खूप छान वाजवतात.त्यांनी नर्मदा परिक्रमा दोन वेळा पायी केली आहे.ते जागरण गोंधळ पण अति उत्तमपणे करतात .ते शेती काम करतात आणि भजनाच्या स्वरूपाने आपली संस्कृती व परंपरा जपतात .यांच्यामुळेच खरी आपली परंपरा चालू आहे अशा वारकऱ्यांना मनापासून धन्यवाद. वारीमध्ये सर्व जाती धर्माचे ते म्हणतात बारा पगड जाती आपल्या धर्मामध्ये आहे या सर्व दिंडीमध्ये असतात.इथे कोणी लहान नाही कोणी मोठे नाही. आज नगर मधुन पिकपमध्ये पंढरपूर ला विठु माऊली च्या दर्शनासाठी जाणार आहे.दर्शन करून आले का परत पायी चालत जाणार.नंतर फक्त कळसाचेच दर्शन होते. बाकीचे पुढच्या अंकात—
सौ कमलताई गोकुळ गायकवाड (म्हसरूळ)
जिल्हा उपाध्यक्ष वारकरी मंच महाराष्ट्र राज्य