आशाताई बच्छाव
एसबीआय इन्शुरन्सच्या अनागोंदी कारभाराविरोधात ठिय्या आंदोलन
वीस दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे
लासलगाव येथील भारतीय स्टेट बँक शाखा व एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, नाशिक यांच्या मनमानी व निष्काळजी कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते मनोहर भाऊ बोचरे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन छेडण्यात आले.
या आंदोलनाची वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात आली असून, एसबीआयचे मुख्य प्रबंधक मनीष रामटेके यांनी स्वतः हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक चर्चा केली. त्यांनी संबंधित मागण्या वीस दिवसांच्या आत मार्गी लावण्याचे स्पष्ट आश्वासन दिले.
या वेळी समता परिषदेचे नेते दिलीप अण्णा खैरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष भाऊसाहेब भवर, शाखा अधिकारी मोहित सोनार, अशोक नागरे, गोरख शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कररावजी शिंदे, माजी सरपंच विनोद जोशी, माजी सभापती शिवा सुरासे, पांडुरंग राऊत, विशाल चांदर, संतोष पानगव्हाणे, डॉ. श्रीकांत आवारे, सचिन होळकर, धनंजय जोशी, अशोक बोचरे, राजेंद्र मेमाणे, विनायक बोचरे, रवींद्र बोचरे, ज्ञानेश्वर आरोटे, राजेंद्र कांबळे, योगेश बोचरे आदी मान्यवर उपस्थित होते.