आशाताई बच्छाव
बच्चू कडू यांना न्यायालय कडून मोठा दिलासा अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर कायम, माजी आमदार बच्चू कडू म्हणाले न्याय देवतेने न्याय केला. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अमरावती जिल्हा बँकेचे अध्यक्ष पदाचा अपात्रता निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने समिती दिली आहे त्यामुळे बच्चू कडू यांना मोठा दिलासा मिळाला आहे त्यामुळे बच्चू कडू यांना मोठा दिलासा मिळून बच्चू कडू यांचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष पद कायम राहणार आहे. १६ जून रोजी बच्चू कडू यांना अपात्र ठरवण्यात आले होते उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले न्यायालयाने अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून दिलेल्या निर्णया हा सत्याचा विजय आहे जिल्ह्यातील काही काँग्रेसने ते भाजपचे स्लीपर सेल म्हणून काम करीत आहे भाजपच्या मदतीने त्यांनी बँकेतून आम्हाला हटविण्याचा प्रयत्न केला परंतु न्यायदेवतेने न्याय केला आहे शेतकरी कामगार मजूर व दिव्य या सर्वांच्या आशीर्वाद यामागे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. २0१७ मध्ये नाशिक येथील एका आंदोलन प्रकरणी बच्चू कडू यांच्याविरुद्ध सुक्रवारा पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी न्यायालयाने त्यांना एक वर्षाची शिक्षा सुनावली होती अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नियमानुसार संचालकाला न्यायालयाकडून एक वर्ष पर्यंत शिक्षा झाल्यास तो पदार होऊ शकत नाही याच मुद्द्यावर धरून बँकेतील विरोधी गटातील बारा संचालकांनी हरिभाऊ मोरे यांच्या नेतृत्वाखाली बच्चू कडू यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली होती सहकार विभागाचे विभागीय सहबंदी बंद प्रवीण फडणीस यांनी विरोधी गटाच्या तक्रारीची दखल घेत बच्चू कडू यांना नोटीस बजावली होती त्यानंतर २४ फेब्रुवारी रोजी त्यांना आपली बाजू मांडण्यात सांगण्यात आले त्यानंतर सहनिबंधक यांना अपात्र ठरण्याचा निर्णय घेतला आणि पुढील पाच वर्षापर्यंत बँकेची कोणती निवडणूक लढविण्यास बंदी घातली होती या निर्णयाविरोधात बच्चू कडू यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाद मागितली मंगळवारी झालेल्या सोनुने न्यायालयाने विभागीय सहनिबंधक यांच्या आदेशाला स्थगिती दिली असून त्यामुळे बच्चू कडू यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.