आशाताई बच्छाव
गायक हावगी पन्नासे यांना स्वरगंधर्व पुरस्कार प्रदान…
मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज वंटगिरे प्रतिनिधी
स्वरगंधर्व गायक हावगी पन्नासे यांना उदगीर येथील श्रीगुरु हावगीस्वामी मठ संस्थानच्या वतीने श्री ष.ब्र.१०८ सदगुरु डॉ.शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्या ५७ व्या जन्मदिवस तथा गुरुगौरव सोहळ्यानिमित्त श्रीगुरु हावगीस्वामी वीरशैव लिंगायत भवन उदगीर येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्कार मिळाला श्रीगुरु हावगीस्वामी मठाचे शिष्य तथा कौठा येथील भुमीपुत्र विरशैव लिंगायत परंपरेतील समाजातील सांप्रदायातील एक अनमोल रत्न नामवंत गायक स्वरशिरोमणी हावगी उत्तम पन्नासे यांना ( स्वरगंधर्व ) पुरस्कार श्री ष.ब्र.१०८ सदगुरू शंभुलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यासोबतच अनेक शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या हस्ते तथा उपस्थित सामाजिक राजकीय शैक्षणिक धार्मिक सांस्कृतीक क्षेत्रातील मान्यवर मंडळी व हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत स्वरगंधर्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी उपस्थित माजी नगराध्यक्ष राजेश्वर नीटुरे ,किर्तनकार मंडळाचे अध्यक्ष शि.भ.प.शिवराज नावंदे गुरुजी,शि.भ.प. उद्धव महाराज हैबतपुरे,विरभद्र स्वामी सताळा व इतर मान्यवर उपस्थित होते.






