Home नांदेड पावसाअभावी खरीपाची पिके धोक्यात; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट.

पावसाअभावी खरीपाची पिके धोक्यात; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट.

92

आशाताई बच्छाव

1001632651.jpg

पावसाअभावी खरीपाची पिके धोक्यात; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट.

मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज वंटगिरे 

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद परीसरात यंदाच्या खरीप हंगामात पुर्व मोसमी पाऊस मे महिन्यात झाला तसेच मृग नक्षञाच्या सुरुवातीला देखील जोरदार पाऊस झाला तसेच असंख्य हवामान अभ्यासकांच्या मते जुन महिन्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात अतिवृष्टी सदृश पाऊस होईल असे व्हिडिओ समाजमाध्यमांत मोठ्या प्रमाणात पसरवण्यात आले त्याच अनुषंगाने
तालुक्यात जूनच्या सुरुवातीलाच पावसाची आगमनाची चिन्हं दिसून आली होती. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी पावसावर विश्वास ठेवून पहिल्या हप्त्यात पेरण्या सुरू केल्या. काही भागात पेरणी पूर्ण झाली होती, पण नंतर अचानक पावसाने पाठ फिरवली. आता तब्बल आठ-दहा दिवसांपासून पाऊसाने दडी मारल्याने उगवलेली सोयाबीन,कापूस,तुर, उडीद व मुग ही पिके उन्हाच्या चटक्यांमुळ व सोसायट्याच्या वाऱ्यामुळे शुष्काशित झाल्यामुळे करपून जात आहेत यांमुळे आता नुकसान दिसू लागले असून, दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे टाकले आहे.
शेतकर्‍यांनी पेरणीसाठी पतसंस्था, बँका आणि खासगी सावकारांकडून कर्ज घेतले. आता दुबार पेरणी करायची तर पुन्हा खर्च लागणार, पण पहिल्याच पेरणीचं उत्पादन मिळालं नाही. त्यामुळे ‘कर्ज फेडायचं कसं?’ हा यक्षप्रश्न शेतकर्‍यांना छळतोय याकारणे तालुका प्रशासनाने कृषी व महसूल विभागाने नजरपाहणी करुन होत असलेल्या नुकसानीची प्राथमिक व मानसिक संकटात सापडला जाण्याची शक्यता आहे.

Previous articleठाकरे सेनेच्या मुखेड विधानसभा प्रमुखपदी मन्मथअप्पा खंकरे यांची निवड. ∆∆निष्ठावंत शिवसैनिक म्हणून तालुक्यात ओळख∆∆
Next articleगायक हावगी पन्नासे यांना स्वरगंधर्व पुरस्कार प्रदान…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.