Home नांदेड ठाकरे सेनेच्या मुखेड विधानसभा प्रमुखपदी मन्मथअप्पा खंकरे यांची निवड. ∆∆निष्ठावंत शिवसैनिक म्हणून...

ठाकरे सेनेच्या मुखेड विधानसभा प्रमुखपदी मन्मथअप्पा खंकरे यांची निवड. ∆∆निष्ठावंत शिवसैनिक म्हणून तालुक्यात ओळख∆∆

59

आशाताई बच्छाव

1001632622.jpg

ठाकरे सेनेच्या मुखेड विधानसभा प्रमुखपदी मन्मथअप्पा खंकरे यांची निवड.
∆∆निष्ठावंत शिवसैनिक म्हणून तालुक्यात ओळख∆∆

मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज वंटगिरे 

मुखेड तालुक्यात अनेक वर्षापासून शिवसेना पक्षाचे निष्ठावंतपणे कार्य करुन वंचित घटकांना, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे शिवसैनिक म्हणून संपूर्ण तालुक्यात परिचित असणारे.
मागील अनेक वर्षापासून ठाकरेच्या शिवसेनेची एकनिष्ठ असलेले स्वर्गवासी हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन ८० टक्के समाजकारण २०% राजकारण याच तत्वावर चालणारे कडवट शिवसैनिक मन्मथअप्पा खंकरे यांची मुखेड शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे मुखेड तालुक्यात फटाके फोडत आनंद साजरा करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
मन्मथ खंकरे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून पक्ष वाढीसाठी काम करून अनेक शिबीरे, शेतकरी आंदोलने, मोर्चे करून आपला पक्ष वाढीसाठी काम केले आहेत. त्याच कामाची पावती म्हणून आज त्यांना मुखेड विधानसभा प्रमुख पदी नियुक्ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार
निवड केली. या निवडीबद्दल अनेकांनी फोनवर शुभेच्छा दिल्या आहेत.
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुकीत तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला गतवैभव प्राप्त करून जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून आणण्याचा निर्धार नुतन विधानसभा प्रमुख मन्मथअप्पा खंकरे यांनी सांगितले. यांच्या निवडीबद्दल जेष्ठ शिवसैनिक माधवराव देशमुख, लक्ष्मण कोळेकर, विरेश इंन्दुरे, ज्ञानेश्वर पांढरे, बालाजी कदम, राम कोळेकर, सुरेश औरादे, सोमनाथ बोधणे, सुनिल बेल्लेवार, सदानंद घाळे, यांच्यासह अदिंनी अभिनंदन केले..

Previous articleपावसाने मारली दडी शेतकऱ्यांवर दुबारा पेरणीचे संकट
Next articleपावसाअभावी खरीपाची पिके धोक्यात; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.