Home नाशिक लासलगाव स्टेट बँक जनरल इन्शुरन्स च्या मनमानी कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते मनोज बोचरे...

लासलगाव स्टेट बँक जनरल इन्शुरन्स च्या मनमानी कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते मनोज बोचरे यांचे ग्रामस्थांसह बँकेसमोर ठिय्या आंदोलन

32
0

आशाताई बच्छाव

1001631626.jpg

लासलगाव स्टेट बँक जनरल इन्शुरन्स च्या मनमानी कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते मनोज बोचरे यांचे ग्रामस्थांसह बँकेसमोर ठिय्या आंदोलन

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

भारतीय स्टेट बँक लासलगाव शाखा व एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी यांच्या मनमानी आणि निष्काळजी कारभाराविरोधात देवगाव ता.निफाड सामाजिक कार्यकर्ते मनोहर बोचरे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून बँक शाखेसमोर ग्रामस्थांसह ठिय्या आंदोलन सुरू झाले आहे.
सन २०२२ मध्ये एस.बी.आय.जी.आरोग्य प्लस या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यांमधून विमा हप्ता म्हणून रक्कम कपात करण्यात आली. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आरोग्य विम्याचे फायदे सांगून खातेदारांची सहमती घेतली, परंतु प्रत्यक्षात विमा उतरवला गेला नाही. त्यामुळे आज चार वर्षांनंतरही पॉलिसी मिळालेली नाही. पीडित खातेदारांनी वारंवार बँक आणि इन्शुरन्स कंपनीशी संपर्क साधूनही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. परिणामी, तातडीच्या आरोग्यविषयक गरजांवेळी विम्याअभावी त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे. याबाबत मनोहर बोचरे यांचा तीन वर्षांपासून पाठपुरावा सुरु आहे. मात्र संबधितांकडून त्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखविण्यात आली. त्यामुळे आंदोलकांनी आज दि.२३ जून पासून बँकेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची खा.भास्कर भगरे यांनी तातडीने दखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. आंदोलनस्थळी स.पो.नि. भास्करराव शिंदे यांनी भेट देऊन कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. आंदोलनस्थळी मा.सभापती शिवा सुरासे, माणुसकी फाउंडेशनचे सागर निकाळे, डॉ.विकास चांदर, केशवराव जाधव, संतोष पानगव्हाणे, डॉ.सुजित गुंजाळ, रा.काँ.
विधानसभा अध्यक्ष नलिनी शिंदे, लासलगाव कृ.ऊ.बा.स.संचालक डॉ.श्रीकांत आवारे, बाळासाहेब होळकर आदी मान्यवरांनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला.
बँकेचे मुख्य प्रबंधक मनीष रामटेके व शाखा व्यवस्थापक मोहित सोनार यांनी आंदोलकांशी चर्चा करून प्रकरण कायदेशीर तक्रार निवारण कक्षाकडे पाठवण्याचे आश्वासन देऊन ३० दिवसांची मुदत मागितली, मात्र आंदोलकांचे समाधान न झाल्याने आंदोलन सुरूच राहिले.
◆ शेतकऱ्यांच्या मागण्या:
विमा उतरवण्याबाबतची चौकशी करावी
पॉलिसीची प्रत तत्काळ उपलब्ध करून द्यावी
जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी
◆ गंभीर गैरव्यवहाराची शक्यता, आंदोलकांचा सवाल, “विश्वास ठेवायचा तरी कुणावर?”
“नावाजलेल्या बँकेच्या शाखेतच जर ग्राहकांची अशी फसवणूक होत असेल, तर सामान्य नागरिकांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर?” असा संतप्त सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या मते, हे प्रकरण केवळ दुर्लक्ष नव्हे, तर मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे लक्षण आहे.
भारतीय स्टेट बँक शाखा लासलगाव व एसबीआय जनरल इन्शुरंन्स कंपनी लिमिटेङ नाशिक शाखा यांच्या अनागोंदी कारभारा विरोधात लासलगाव येथे मनोहरभाऊ बोचरे यांचे ठिय्या आंदोलन सुरु यावेळी खासदार भास्कर भगरे सर यांनी दूरध्वनी करून संपूर्ण आंदोलनाची माहिती घेतली व वरिष्ठ स्तरावर बोलणे करतो असे सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कररावजी शिंदे साहेब, पोलीस कॉन्स्टेबल सुजय दादा बारगळ, औदुंबर मुरडणार दादा,माजी सभापती शिवा सुरासे, माणुसकी फाउंडेशनचे सागर निकाळे,डॉ.विकास चांदर, सामाजिक कार्यकर्ते केशवभाऊ जाधव,संतोष पानगव्हाणे, यांनी डॉ.श्रीकांत आवारे,करण वावधने, माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब बोचरे, राजाराम मेमाणे,धनजय जोशी,संतोष हुजबद,योगेश कूलथे,संपतराव आढागळे, रेवणसिद्ध लोहारकर, राजेंद्र कांबळे, रामा बोचरे,विलास शिरसाठ, दिपक आव्हाड यांनी भेटी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here