Home उतर महाराष्ट्र श्रीरामपूरात आमदार गोपीचंद पडळकर यांचा ख्रिस्ती समूदायाकडून निवेदन देऊन निषेध

श्रीरामपूरात आमदार गोपीचंद पडळकर यांचा ख्रिस्ती समूदायाकडून निवेदन देऊन निषेध

10
0

आशाताई बच्छाव

1001629763.jpg

श्रीरामपुर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी:- सोमवार दिनांक 23 जुन २०२५ रोजी ऑल पास्टर फेलोशिप श्रीरामपुर व ख्रिस्ती विकास‌ परिषद यांच्या वतीने तहसिल कार्यालयात नायब तहसिलदार श्रीमती व्हि. आर. कल्हापूरे( सांळुके) यांना निवेदन देण्यात आले की, सांगली येथील राजगे परिवारीवारातील ऋतुजा या विवाहीतेने आत्महत्या केली. परंतु या घटनेला ख्रिस्ती धर्मगुरुच जबाबदार आहे व जो कोणी ख्रिस्ती धर्मगुरुच जीवे मारेल त्यास ११ लाख रुपयाचे बक्षीस देण्यात येईल. अशी जाहीरपणे आ.गोपीनाथ पडळकर यांनी घोषणा केली. त्यांच्या या व्यक्तव्याचा जाहीर निषेध व शासनाने त्याच्यावर योग्य कारवाई करून त्यांची आमदारकी रद्द करावी.असे मागणी वजा निवेदन देण्यात आले. ख्रिस्ती समाजाची विनाकारण बदनामी करु नये. ख्रिस्ती समाज दया, शांती दाखविणारा आहे. म्हणून आमदाराने जे व्यक्तव केले आहे. असे यावेळी प्रांताधिकारी साहेब तसेच पोलिस अधिक्षक यांना निवेदन देताना ऑल पास्टर फेलोशिपचे अध्यक्ष रेव्ह राजेश कर्डक यांनी आपले सर्व ख्रिस्ती समाजाच्या वतीनो मनोगत व्यक्त केले.
यावेळी ख्रिस्ती विकास परिषेदचे जिल्हाध्याक्ष दिपक कदम, पा. राजेश कर्डक, पा. विजय खाजेकर, पा. सुभाष खरात,पा. प्रविण गायकवाड, पा. दिपक शेळके, पा. शैलेश अमोलिक , सिस्टर आशा मसिहा, पा. सतिष गायकवाड,पा. आण्णा अमोलिक, पा. चेतन सातदिवे, पा. योगेश ठोकळ, पा. विल्सन बोर्डे, पा. प्रविण सातदिवे, पा. अमर दिवे, पा. लाजारस देठे, पा. भूषण वाव्हाळ, पा.विजू खरे, पा. अभिलेख अमोलिक, पा. संदीप गायकवाड, पा. समीर आल्हाद, पा. भालेराव, पा. नेहम्या, पा. सोळशे, पा. योसेफ वागळे, पा. रमेश भोसले, पा. राजू शिरसाठ, पा. कैलास शिरसाठ, अतिश साळवे, गणेश तुपे, नितीन जाधव, अल्ताफ शेख, विशाल तेलोरे, अविनाश गांगुर्डे, राजेंद्र आवारे आणि इतर ऑल फेलोशिपचे सर्व धर्मगुरु निवेदन देतेसमयी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here