Home नाशिक संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंम्मेलनाची तारीख निश्चित

संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंम्मेलनाची तारीख निश्चित

145

आशाताई बच्छाव

1001595174.jpg

संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंम्मेलनाची तारीख निश्चित

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

“संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन” च्या तारखेविषयीची उत्सुकता आता संपली असून आज एकादशीच्या पावन मुहुर्तावर घोषित करण्यात येत आहे. हे पवित्र असे महासंमेलन १७ आणि १८ जानेवारी २०२६ ला घेण्याचे निश्चित झाले आहे. संत नामदेव महाराजांना मानणाऱ्या लाखो भाविकांची उत्सुकता आणि लक्ष संमेलनाच्या तारखेकडे लागलेले होते आता तारीख जाहीर झाल्यामुळे उत्साह शिगेला पोहचला आहे.हे महासंमेलन संत नामदेव महाराजांच्या अजरामर विचारांवर आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेवर आधारित असून, समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचा एक पवित्र आणि ऐतिहासिक उपक्रम आहे अशी माहिती पत्रकार गायत्री योगेश लचके नाशिक यांनी दिली आहे.
संत नामदेव महाराजांनी आपल्या जीवनातून समता, भक्ती, एकात्मता आणि मानवतेचा जो संदेश दिला, तो आजच्या काळात विशेष महत्वाचा आहे. या महासंमेलनाच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचा जागर केला जाणार आहे आणि विविध कार्यक्रमांद्वारे सामाजिक सलोखा, एकात्मता व सद्भावनेचा प्रचार केला जाणार आहे. या कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी, सडक आणि परिवहन केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी,महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस , सर्व राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री , पूज्यनीय सरसंघचालक मोहनजी भागवत तसेच देशातील अनेक गणमान्य व्यक्ती यांना निमंत्रित करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमात आपल्या सर्वांच्या सक्रिय उपस्थितीची आणि सहभागाची अत्यंत आवश्यकता आहे.
आपण समाजातील इतर बंधूंना, भगिनींना देखील या कार्यक्रमाबद्दल माहिती देऊन सहभागी करून घ्यावे असे आवाहन आणि विनंती देशातील सर्व प्रमुख समाज बांधवांना आणि कार्यकर्त्यांना आयोजन समिती तर्फे करण्यात येत आहे .
संतश्रेष्ठ शिरोमणी नामदेव महाराज यांचे जीवनकार्य, विचारधारा आणि समतावादी तत्वज्ञान ,राष्ट्रीय एकात्मतेसाठी योगदान संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी ठरले आहे. त्यांच्या कार्याचा जागर करीत, समाजात विसरले गेलेले ऐक्य आणि समानतेचे मूल्य पुन्हा एकदा उजळवण्यासाठी, “संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन” नागपूर येथे आयोजित करण्यात येत आहे.आज समाज विविध पोटशाखांमध्ये विभागला गेला आहे. मतभेद, भेदभाव, दुर्लक्ष आणि विस्मृती यामुळे एकतेचा आत्मा हरवत चालला आहे. या महासंमेलनाद्वारे आपण सर्वांनी एकत्र येऊन, सर्व मतभेद बाजूला ठेवून, एकात्मतेचा दीप पुन्हा पेटवण्याची वेळ आली आहे.या महासंमेलनाचा प्रभाव फक्त एका घटकापुरता मर्यादित राहणार नाही, तर सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातही त्याचे दूरगामी परिणाम दिसून येतील. येणाऱ्या पिढ्यांना हे संमेलन प्रेरणास्थान ठरेल. संत नामदेव महाराज यांच्यावर आणि त्यांच्या अनुयायांवर जो अन्याय झाला आहे, त्याचे प्रायश्चित या संमेलनाद्वारे घडवण्याची ही ऐतिहासिक संधी आहे.म्हणूनच आपण सर्वांनी—शहरातील, ग्रामीण भागातील, देशभरातील—लाखोंच्या संख्येने या महासंमेलनात उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.
संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन आयोजन समितीने सर्व शिंपी समाज बांधवांना नम्र आवाहन केले आहे की आपण आपली उपस्थिती लवकरात लवकर निश्चित करून, शिंपी समाजातील सर्व बंधू आणि भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने या ऐतिहासिक महासंमेलनात सहभागी व्हावे, आणि या न भूतो न भविष्यती अशा भव्य दिव्य समारंभाचे भागीदार व्हावे.आपला सहभाग म्हणजे केवळ कार्यक्रमाची शोभा वाढवणारा नव्हे, तर संत परंपरेच्या विचारांना पुढे नेणारा एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.संत नामदेव महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन एक नवा सामाजिक क्रांतीचा अध्याय सुरू करूया!
चला नागपूर…..चला नागपूर
राष्ट्रीय एकात्मतेसाठी……संत नामदेव महाराजांच्या विचारांसाठी…

Previous articleनवीन झाडे लावून पर्यावरणाची हानी भरून काढण्याच्या अटीवरच लोह खनिज प्रकल्पाला टप्प्याटप्प्याने काम करण्यास परवानगी – वनविभाग
Next articleपक्षीप्रेमी दिलीप कोकाटे यांनी दिले कबुतराला जीवदान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.